कोवीड रूग्णांच्या उपचारासाठी पाटीदार इमारतीत २०० बेड्स सज्ज

  डाँक्टर राहुल घुले यांच्या मार्गदर्शनाखाली येथे २५ तज्ञ डाँक्टर, ३५ नर्स १५ वार्डबॉय अशी मेडिकल टीम मानधनतत्वावर रूग्णांची देखरेख करीत मोफत उपचार करणार         

कल्याण : कल्याण डोबिंवली मनपाच्या माध्यमातून सोनारपाडा डोबिंवली येथे प्रशस्त व सुसज्ज पाटीदार समाज इमारती मध्ये कोरोना रूग्णांसाठी २०० बेड आँक्सिजन सुविधा सह, १०बेड आयसीयु सुविधाचे कोरोना सेन्टर अल्पशा कालावधीत  सर्व सोयी सुविधायुक्त मनपाने  करून  दाखविले असुन रुग्ण सेवेसाठी सज्ज झाले आहे. उद्याच्या  लोकाअर्पण नंतर मनपाक्षेत्रातील गोर गरीब अर्थिक दुर्बल घटक रुग्णावर मोफत उपचारामुळे मोठा आधारमिळणार आहे.
डोबिंवली पुर्वेतील सोनार पाडा परिसरातील कल्याण शीळ रस्त्यानजीक पाटीदार भवन ४मजली भव्य प्रशस्त जागेतील इमारतीत १ ते ४ मजल्यावर आँक्सिजन सुविधा बेड, २०० तसेच १० आय सी.यु बेड तयार असुन प्रत्येक मजल्यावर टाँयेलट बाथरूम सुविधा सह सी सी.टी. व्ही तसेच करमुणीकीसाठी संगीत सुविधा उपलब्ध असुन लीफ्ट सुविधा आहेत. डाँक्टर व स्टाफ साठी विशेष कक्षासस रूम असुन दर्शनी भागात पहिल्या मळ्यावर भव्य अँडिमशन् कक्ष सुविधा आहे. पाटीदार समाजाने सामजिक बांधलिकी जपत मनपाला कोरोना लढ्यासाठी ही   भव्य इमारत उपलब्ध करून दिली आहे.
 खासदार श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने वन रुपी क्लिनिकचे डाँक्टर तसेच नर्स स्टाँफ् येथे २४ तास रूग्ण सेवा करणार आहे. डाँक्टर राहुल घुले यांच्या मार्गदर्शनाखाली येथे २५ तज्ञ डाँक्टर, ३५ नर्स १५ वार्डबॉय अशी मेडिकल टीम मानधनतत्वावर रूग्णांची देखरेख करीत उपचार करणार असुन औषधासह रूग्णांवर येथे मोफत उपचार होणार असल्याचे डॉ. राहुल घुले यांनी सांगितले.
  आयुक्तांच्या सुचनेनुसार शहर अभियंता सपना कोळी, कार्यकारी उपभियंता सुरेंद्र टेंगळे, जे. ई. नाखावे यांनी अल्पवधीतच पाटीदार भवन येथे १९० आँक्सिजन बेड, १०आय् सी. यु. बेडचे रूग्णालय साकारले असून शनिवारी या रुग्णालयाचे तसेच आसरा फाउंडेशनच्या आरोग्य केंद्राचे आणि गौरीपाडा येथील स्वॅब टेस्टिंग लॅबचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आँनलाईन उद्घाटन करणार असल्याचे आयुक्त डाँ. विजय सुर्यवंशी यांनी सांगितले.

 506 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.