शहापूर तालुक्यासाठी पालकमंत्र्यांनी दिल्या आठ रुग्णवाहिका

शिवसेनेचे ग्रामीण जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील व माजी आमदार पांडुरंग बरोरा यांनी वाढीव रुग्णवाहिकांची केली होती मागणी

शहापूर : शहापूर तालुक्यातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे कोरोना पॉझिटिव्ह व निगेटिव्ह रुग्णाची ने-आण करण्यासाठी रुग्णवाहिकांची कमतरता भासत असल्याने सर्व सामान्य रुग्णाच्या रुग्णवाहिकाचा वापर होत असल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे शिवसेनेचे ग्रामीण जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील व माजी आमदार पांडुरंग बरोरा यांनी शहापूर तालुक्याला वाढीव रुग्णवाहिका मिळण्याची मागणी केली होती.याची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांच्या सहकार्याने कंत्राटी पद्धतीने खाजगी प्रवाशी वहातुक करणाऱ्या काळ्या-पिवळ्या ८ जीप तालुक्याच्या प्रत्येक शासकीय रुग्णालयात देण्यात आल्या असून त्याचा रुग्णवाहिका प्रमाणे कोरोना रुग्ण वहातुकीसाठी होणार असल्याने रुग्णाची परवड थांबणार आहे. वाड्यावस्त्यांमधील कोरोनाग्रस्त व साथीच्या आजाराच्या रुग्णांची गुरुवारपासून ने-आण करीत आहेत.या कोरोनाच्या निमित्ताने तालुक्यात रोजच उद्भवणाऱ्या समस्यांची शासन स्तरावर सोडवणूक करण्यासाठी प्रकाश पाटील व माजी आमदार पांडुरंग बरोरा निकराने पाठपुरावा करीत आहेत.

 513 total views,  3 views today

Leave a Reply

Your email address will not be published.