घाटघर वसाहतीत व्याघ्रदर्शन

एम पॉईंट येथे डोळखांब येथील महेंद्र सांबरे या दुचाकीस्वाराला एकदा दुपारी व दोनच दिवसांनी त्याच ठिकाणी रात्री १० च्या सुमारास व्याघ्रदर्शन झाल्याने नागरिकांत घबराट पसरली आहे

शहापुर : शहापूर तालुक्यातील डोळखांब नजीक असलेल्या घाटघर जलविद्युत प्रकल्प वसाहत परीसरात काल रात्री एका दुचाकीस्वाराला व्याघ्रदर्शन झाल्याने नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे.
शहापुर तालुक्यातील डोळखांब नजीक असलेल्या चोंढे येथील घाटघर जल उदंचन वीज प्रकल्प वसाहत परिसरातील मुख्य रस्त्यालगत एम पॉईंट येथे डोळखांब येथील महेंद्र सांबरे या दुचाकीस्वाराला एकदा दुपारी व दोनच दिवसांनी त्याच ठिकाणी रात्री १० च्या सुमारास व्याघ्रदर्शन झाल्याने नागरिकांत घबराट पसरली आहे.
या परिसरात चोंढे, बनाचीवाडी, बोरीचीवाडी, शेकटवाडी, मोहाचीवाडी आदी गावातील आदिवासींच्या शेळ्या,गाई,म्हशी या अगोदर वाघाने फस्त केल्याच्या घटना वनविभागाच्या दप्तरी नोंदी आहेत.गेली चार पाच वर्षांपासून हा बिबट्या या परिसरात आढळतो असे स्थानिकांचे म्हणणे आहे.
डोळखांब पासून अवघ्या आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या या परिसरातून नोकरी व्यवसायानिमीत्त ये जा करणाऱ्या शेतकरी,वनकर्मचारी यांनाही या अगोदर व्याघ्रदर्शन झाले आहे.

“हा सर्व जंगल परीसर सुरक्षित असून खाद्य मुबलक प्रमाणात मिळत असल्याने येथे वाघाचा संचार असण्याची शक्यता आहे.नागरिकांनी केलेल्या तक्रारीवरून तपास सुरू असून प्रतिबंधात्मक उपाय करण्यात येतील!”

  • प्रशांत निकाळजे
    वनक्षेत्रपाल डोळखांब,ता.शहापूर

 506 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.