पर्यटन उद्योगासाठी “कमबॅक” – शमिका जोशी

पर्यटन आणि आतिथ्य उद्योगास कोरोना युद्धाच्या काळात मंदी पहायला मिळाली तर आश्चर्य वाटण्यासारखे नाही. शिवाय, हा उद्योग मुख्यत: दळणवळण केंद्रित असल्याने त्यावर अत्यंत वाईट परिणाम झाला आहे. खरंच, बर्‍याच दिवसांपासून तथाकथित सुट्ट्यात घरामध्ये कोंडून राहणे कठीण झाले आहे. सध्याच्या साथीच्या परीस्थितीत या विषाणूशी लढण्यासाठी सामाजिक अंतर हाच मुख्य उपाय असल्याने चिंता अजूनच वाढली की, “कोव्हीड 19 नंतर पर्यटन उद्योग कशा प्रकारे कमबॅक करेल?”

ह्या साथीच्या रोगाच्या सुरुवातीच्या काळापासूनच पर्यटनाचा उद्योग मोठ्या प्रमाणात प्रभावित झाला आहे अणि तो ही केवळ भारतातच मर्यादित नाही तर जगभरात परीणाम झाला आहे. पूर्ण क्षमतेने देशाच्या आर्थिक वाढीस हातभार लावण्यास सुरुवात करणारा नजिकच्या काळातला हा शेवटचा उद्योग असू शकेल असे समजू. तथापि, हा लवचिक उद्योग नेहमीच्या ट्रेंड आणि पध्दतींसह कमबॅक करत आला आहे जसे की २००७-२००९   जागतिक पातळीवरील आर्थिक संकटे असू शकतात, नवीन संरचना आणि एकत्रित पध्दतींमुळे जोरदार पुनरागमन केले होते. त्यानंतर २००९-२०१० मध्ये स्वाईन फ्लू (साथीचा रोग) सर्व देशात नव्हे तर जगात पसरत असलेला असताना पर्यटन उद्योगात आणखी घसरणीची शक्यता वर्तविली जात होती, परंतु त्याऐवजी तो अधिक तत्परतेने उभा राहिला. पर्यटन उद्योग हा नेहमीच जागतिक राजकीय गतिशीलता, संघर्ष आणि सार सारख्या उद्रेकांमधून जात असताना विकसित होत गेला. प्रत्येक वेळी तो केवळ सावरलाच नाही आणि केवळ व्यवसायाच्या दृष्टीनेच नव्हे त्यानं तर मुख्य महसूल प्रवाहात सुद्धा महत्वाचं स्थान पटकावलं.

प्रत्येक परिस्थिती जरी आपापल्या परीने अतुलनिय असली तरी सामाजिक अंतर प्रथमतः उपचारात्मक उपाय म्हणून सुचविण्यात येतो तेव्हा हस्तांदोलनच नव्हे तर ईतर कशालाही स्पर्श करताना सर्वांनीच सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. असा साथीचा रोग सर्व देशभर (किंवा खंडभर) पसरलेला असताना, पर्यटन व्यवसायचा कमबॅक देशातील ग्रामीण भागातून रोजगार परत आणण्याच्या जबाबदारीच्या मार्गानेच आणता येणे सुकर होईल.


सेंट ऑगस्टीन यांच्या, “हे जग एक पुस्तक आहे आणि जे प्रवास करीत नाहीत ते केवळ आयुष्यभर एकच पृष्ठ वाचतात.” वाक्याशी सहमत असताना चला आपण आशा करूया की आपण हे व्हायरस विरूद्ध युद्ध जिंकू आणि लवकरच पुन्हा पर्यटनाममार्फत आपापल्या ध्येयाचा शोध घेण्याची संधी मिळवू. जसे हवाई प्रवासादरम्यान सुचवले जाते – इतरांना मदत करण्यापूर्वी स्वत:ला मदत करा, तसे ह्या वेळी आपण प्रथम आपल्या देशासाठी उभे राहू. आपण, या विस्तीर्ण, वैविध्यपूर्ण आणि एकत्रित देशातील अभिमानी नागरिक आगामी काळात जबाबदार प्रवासी म्हणून योगदान देऊ शकतो.

प्रवास प्रेमींसाठी पुढील मार्ग, एक्सप्लोरर्स संस्कृतीचा अनुभव घेण्यासाठी जवळपासच्या गावात एक लहान टप्प्यावरील प्रवास किंवा शनिवार/रविवारचा (विकेंड गेटवे) प्रवास नियोजित करुन पर्यटनाची सुरुवात करणे सोयिस्कर ठरेल. ग्रामीण जीवनशैली, ग्रामीण भागातील शेती प्रक्रिया, विविध प्रकारची वेषभूषा, खाद्य संस्कृती आणि बरेच काही, केवळ ग्रामीण भागात फक्त पाहताच नाही, तर अनुभवता सुद्धा येईल. आताच्या काळात सुरक्षित प्रवास करण्यासाठी मोठ्या ठिकाणांच्या लांबच लांब याद्या घेऊन मोठ्या ग्रुपने प्रवास करणे टाळणे महत्वाचे ठरेल. व्हिलेज टूर्स दरम्यान, स्थानिक मालकीचे बेड आणि न्याहारी किंवा होमस्टेज निवडणे केवळ जोखीम कमी करत नाही तर स्थानिक रहिवाश्यानाही रोजगार मिळवूण देण्यास मदत करते. खेड्यांचा अभ्यास केल्याने समाजाला त्यांची परंपरा, कला आणि संस्कृती जपण्यास उद्युक्त केले तर तिच खरी पर्यटन उत्पादने आहेत असे म्हणल्यास वावगे ठरणार नाही. स्थानिक पातळीवर बनवलेल्या हस्तकलांची खरेदी करणे, स्थानिक उत्पादित जेवणाला प्राधान्य देणे, शेतकर्‍यांसोबत शेतीत एक दिवस घालवणे ई. आणि त्याचबरोबर कार्बनच्या फुटप्रिंट कमी केल्याने आपण नक्कीच एक जबाबदार प्रवासी बनू शकतो. प्रवासात जाताना, संपूर्ण प्रवासादरम्यान स्वतःची पाण्याची बाटली घरूनच जवळ ठेवणे आणि प्लास्टिकचा एक वेळ वापर टाळणे ह्यासारख्या एक पावलातून जबाबदार पर्यटकाची भुमिका ठरेल आणि तसेही हे तर निसर्गाने आपल्याला दिलेले बाळकडू सुद्धा आहे.

मला निक्षून उल्लेख करून देताना आनंद होत आहे की, भारतभर अश्या अनेक प्रेरणादायक व्यक्ती आहेत ज्यांनी ग्रामीण पर्यटनाची क्षमता ओळखली आहे आणि त्यात बदल घडवून आणण्यासाठी अथक प्रयत्न केले आहेत. ग्रामीण पर्यटनाचा कल म्हणून ओळख करुन देणे, ती संकल्पना म्हणून विकसित करणे आणि त्यांना प्रत्यक्षात आणणे आव्हानात्मक झाले असेल. उदाहरणार्थ, पांगोंग त्सो तलावाच्या मार्गावर लडाख जिल्ह्यात मान नावाचे एक छोटेसे गाव आहे. दररोज संध्याकाळी स्टार गेझिंग मार्गदर्शित वेधशाळा पर्यटनासह तयार झाल्यापासून हे गाव मानक प्रवासाचा एक अविभाज्य भाग झाले आहे. हा प्रकल्प यशस्वीरित्या चालू करण्यासाठी एका मुलीला मार्गदर्शक कसे असावे आणि स्थापित दुर्बिणी कश्या हाताळायच्या याचे प्रशिक्षण देण्यात आले. ती सध्या तिथल्या स्थानिक शिक्षण कार्यक्रमाचा एक भाग आहे, ती दररोज शेतीची घरगुती कामे आणि पर्यटकांना वेधशाळेत मार्गदर्शन करते. त्याचप्रमाणे देशाच्या ईशान्येकडील गावे, कर्नाटक, मध्य प्रदेशची जंगल खेडे आणि तामिळनाडूमधील अंतर्गत गावे अशी आहेत जिथे बर्‍याच महिला अशा पर्यटन मॉडेलचा भाग बनण्यासाठी पुढे आल्या आहेत. जिथे ते होमस्टेज चालवतात, हस्तकलेचा विकास करतात आणि कृतीतून स्थानिक नैसर्गिक परिसर व संस्कृतिचे जतन करतात.

या लॉकडाऊन दरम्यान, “मिराकी” ला या प्रेरणादायक आणि आश्चर्यकारक स्थाने जाणून घेण्याची आणि त्यांच्याशी संपर्क साधण्याची संधी मिळाली आणि कोव्हीड १९ नंतरच्या पर्वातील अनुभव घेऊन येण्याच्या उत्साहाने त्यांच्या प्रवासाचा एक भाग बनण्याची संधी त्यांना मिळाली. “मिराकी” ने नेहमीच पर्यटकांच्या आणि निसर्गाच्या सुरक्षिततेवर अधिक भर दिला प्रथमतः एक सामाजिक जबाबदारीचा भाग म्हणून. आपण एकत्र येऊन उद्याचा काळ बदलू या आणि सुरक्षित व समृद्ध नैसर्गिक परंपरेचा भाग बनूया… जबाबदार पर्यटक होवून.  सर्व प्रवाशांना शुभेच्छा – शुभास्ते पंथानं: संतु!

शमिका जोशी
सुखसागर नगर, कात्रज , पुणे – ४११०४६
WhatsApp +91 91 5888 6304
Website – http://meraki.tours/
Blog – https://merakitours.blogspot.com/
Facebook – https://www.facebook.com/MerakiItineraies/
Instagram – https://www.instagram.com/meraki_tourspune/

 220 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *