जय भवानी ,जय शिवाजी या घोषणेला विरोध करून नायडू यांनी आपल्या महाराष्ट्रद्वेष्टी प्रवृत्तीचे दर्शन घडवल्याचा केला आरोप
शहापूर : राज्यसभेत शपथ घेताना खासदार उदयनराजे यांचा अपमान करणार्या राज्यसभेचे सभापती व उपराष्ट्रपती व्यकंया नायडू यांचा आज(दि.२४) शिवसेनेतर्फे निषेध करण्यात आला.
शिवाजी महाराजांच्याबाबतीत द्वेषाने केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे महाराष्ट्रातील जनतेच्या भावना दुखावल्या आहेत. “जय भवानी ,जय शिवाजी” या घोषणेला विरोध करून नायडू यांनी आपल्या महाराष्ट्रद्वेष्टी प्रवृत्तीचे दर्शन घडविले आहे त्या बाबत व भजापाचा किन्हवली विभाग शिवसेने तर्फे शिवाजी चौकात जाहीर निषेध करण्यात आला.
शिवसेनेचे उपतालुका प्रमुख विकास गगे,बाळकृष्ण विशे व विभागप्रमुख लक्ष्मण बांगर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात ग्रामपंचायत सदस्य मिलिंद यशवंतराव, गुरुनाथ उबाळे, काळूराम बांगर,झाकीर शेख,सचिन दिनकर,पुंडलिक रिकामे,जयवंत वाघ आदींसह शिवसैनिक पदाधिकारी उपस्थित होते
715 total views, 1 views today