महाराष्ट्र नवनिर्माण राज्य परिवहन कामगार सेनेचेच्या वतीने महाराष्ट्रव्यापी “स्वाक्षरी अभियान” ला सुरुवात
ठाणे : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे मागील तीन ते चार महिन्यापासून एस.टी.चे कामकाज ठप्प असुन प्रवासी वाहतुकीला देखील ब्रेक लागला आहे. परिणामी एसटी विभागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून आर्थिक कोंडी झाली आहे. त्यामुळे एसटीचे उत्पन्न वाढावे यासाठी एस.टी.मालवाहतुक सुरु करावी, शासनाच्या विविध विभागांतुन एस.टी.मालवाहतुक करावी, एस.टी.च्या ६०० बसस्थानकांवर १३ प्रकारचे लघुऊद्योग सुरु करावे आदी मागण्यांचे वेळोवेळी निवेदन देवून देखील सरकार एसटी कर्मचाऱ्यांच्या विरोधी भूमिका प्रशासन व सरकार घेत आहे. त्यामुळे एस.टी.व एस.टी.कामगार यांच्या न्याय हक्कांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण राज्य परिवहन कामगार सेनेच्यावतीने महाराष्ट्रव्यापी “स्वाक्षरी अभियान” राबवत असल्याची माहिती ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष म.न.से. राज्यपरिवहन नैनेश शिरकर यांनी दिली.
एस.टी.मालवाहतुकीचे वर्गीकरण करावे, एस.टी.कर्मचारी कयात करु नये, स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या कर्मचारी यांच्या मुलांना नौकरी द्यावी, शासकिय कर्मचारी यांचेप्रमाणेच एस.टी.कर्मचारी यांना कर्तव्यार्थ मुत्यु आल्यास २५लाख रुपये कोरोनाविमा द्यावा, एस.टी.कामगारांचे बॅक कर्ज माफ करावे, एस.टी.कामगारांना शासकिय शिधावाटप केंद्राचा लाभ द्यावा, एस.टी.ला शासनाने ५हजार कोटी रुपयांची आर्थीक मदत करावी, एस.टी.कामगारांना थकित वेतनासह जोपर्यंत कोरोना महामारीची साथ आहे तोपर्यंत नियमित वेतन दरमहा ७ तारखेला देण्यात यावे, अशा अनेक मागण्याची निवेदने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ऊद्धव ठाकरे, परिवहन मंत्री अनिल परब, व्यवस्थापकिय संचालक शेखर चन्ने यांना वेळोवेळी दिले आहेत. तसेच एस.टी.व.एस.टी.कामगारांच्या समस्या म.न.रा.प.का.सेनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष हरी माळी, कार्याध्यक्ष विकास आकलेकर आदींनी वेळोवेळी मांडल्या आहेत. मात्र, त्यावर शासन व एस.टी.प्रशासन यांनी योग्य निर्णय न घेता, कर्मचारी कपात, वेतन कपात, सक्तीच्या रजा, कमी व विलंबाने वेतन, सन २०१९ च्या एस.टी.कामगार भर्ती ला स्थगीती देण्याचे अन्यायकारक व घटनाविरोधी निर्णय घेण्याचे सत्र चालवले आहे. एस.टी.व एस.टी.कामगारांच्या न्याय हक्कांकरीता महाराष्ट्र नवनिर्माण राज्य परिवहन कामगार सेनेने राज्यव्यापी स्वाक्षरी अभियानास आजपासून प्रारंभ केले असून हा अभियान राज्यव्यापी केला आहे. या स्वाक्षरी अभियानात महाराष्ट्रातील सर्व एस.टी.कामगार व कर्मचारी सामिल झाले होते. त्यावेळी खोपट एसटी डेपोत सह्यांच्या मोहिमेला सुरुवात करत महाराष्ट्र नवनिर्माण राज्य परिवहन कामगार सेनेचे ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष नैनेश शिरकर, जिल्हा सचिव दिनेश बिलकरे,भिवंडी तालुका अध्यक्ष नितीन पडवळ, विश्वास जोगदंडे आदी मनसैनिक उपस्थित होते.
675 total views, 2 views today