कोरोना बाबतीत नागरिकांना विविध सुविधा देण्याची केली मागणी
कल्याण : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता महानगरपालिका व खाजगी रुग्णालया मधून मिळणाऱ्या आरोग्य सेवांबाबत तसेच खाजगी रुग्णालयांच्या लुटमारीकडे आणि कोरोना बाबतीत मनसेचे माजी आमदार प्रकाश भोईर यांच्या शिष्टमंडळाने आयुक्तांचे लक्ष वेधले आहे.
कल्याण डोंबिवली शहरात कोरोना मुळे रुग्णांना बेड मिळवणे अतिशय कठीण होत आहे. तशातच शासकीय रुग्णालय शास्त्रीनगर, रुक्मिणी, आर.आर.रुग्णालय,हॉलिक्रॉस हॉस्पिटलमध्ये कधीही बेड उपलब्ध नसतात व खाजगी रुग्णालय अव्वाचा सव्वा बिल आकारात आहेत. रुक्मिणी रुग्णालयात कोरोना चाचण्या साठी नागरिक रांगेत उभे असतात. तसेच गरोदर महिलाहि पावसा पाण्यात रांगेत उभ्या असतात. अशा वेळेस त्यांना ही व ज्या रुग्णांना कोरोना नसेल अशांनाही बाधा होण्याची परिस्थिती आहे. तरी महिलांसाठी वेगळी रांग व सर्वासाठी शेड बनविणे.
खाजगी रुग्णालय लाख रुपयांपर्यंत डिपॉझिट घेतल्याशिवाय रुग्णांना दाखल करुन घेत नाहीत. पालिकेने ८०% बेड ताब्यात घेतलेत तरीही बेड उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे संपूर्ण १००% बेड पालिकेने ताब्यात घेतल्यास त्यामध्ये कोणतीही आडवाट राहणार नाही व संपूर्ण कल्याणकरांना मोफत उपचार मिळतील. कोरोना रुग्णांना आवश्यक असणारे ईजेक्शन पालिका पातळीवर वाजवी दरात उपलब्ध करुन देणे बाबत विचार करावा.
कोरोना रुग्णांव्यतिरीक्त इतर रुग्णांना व गरोदर महिलांना कोठेही सोय नाही तसेच डायलिसिस साठी नागरिकांना खूप मोठी रक्कम खर्च करावी लागते. तरी कोरोना शिवाय इतर रुग्णंसाठी रुग्णालय राखीव ठेवणे व त्यावर किमान कोरोना काळात बिलावर निर्बंध लावणे. कल्याण पूर्व व पश्चिम मधील बंद अवस्थेत असलेले हॉस्पिटल व महापालिका जागा येथे कॉरटाईन सेंटर उभारावे.
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मंडपासाठी फुटावर दर आकारला जातो तो यावर्षी कोरोना विषाणु प्रादुर्भाव मुळे आलेल्या संकटामुळे दर माफ करावा व परवानगी मोफत दयावी. आदींबाबत मनसेचे माजी आमदार प्रकाश भोईर यांनी पालिका आयुक्तांशी चर्चा केली. याबाबत आयुक्तांनी देखील सकारात्मक प्रतिसाद देत यावर अमलबजावणी करण्याचे आश्वासन दिले.
या शिष्टमंडळात माजी आमदार तथा प्रदेश सरचिटणीस प्रकाश भोईर, जिल्हा सचिव कैलास पनवेलकर, शहर सचिव महेश मोरे, उपशहर अध्यक्ष दिनेश भोये, सचिन पोपलाईत, योगेश गव्हाणे, नगरसेविका सुनंदा कोट, नगरसेवक पवन भोसले, शहर संघटक योगेश सोनी, रुपेश भोईर, कामगार सेनेचे राजन शितोळे, विभाग अध्यक्ष सचिन शिंदे, उपविभाग अध्यक्ष गणेश वावळ, मनविसे शहर अध्यक्ष विनोद केणे, सहसचिव गणेश नाईक आदी जण उपस्थित होते.
557 total views, 1 views today