वेळापत्रक जाहीर केल्याची शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती
मुंबई : राज्यातील कोरोना विषाणूच्या प्रसारावर अद्याप नियंत्रण मिळविण्यात म्हणावे तसे यश आलेले नसल्याने अखेर राज्य सरकारच्या शालेय शिक्षण विभागाने पूर्व प्राथमिक ते १२ पर्यतच्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन शिक्षणाचे वेळापत्रक जाहीर केले. या वेळापत्रकानुसार पूर्व प्राथमिक आणि १ ते २ रीच्या विद्यार्थ्यांसाठी दररोज सकाळी ३० मिनिटाचे ऑनलाईन शिक्षण देण्याचे निश्चित करण्यात आले. तर तिसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी ४५ मिनिटाची दोन सत्रे ऑनलाईन शिक्षण देण्याचे निश्चित करण्यात आल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिले. यापैकी पूर्व प्राथमिक ते दुसरी पर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या पालकांना पहिल्यांदाच ऑनलाईन शिक्षणाच्या दरम्यान विद्यार्थ्यांसोबत रहावे लागणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षकांनी शिकविलेला अभ्यास पालकांच्या मार्फत समजून सांगण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
516 total views, 1 views today