अंबरनाथमध्ये सॅनिटायजर फूट स्टँडचे वाटप

भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष दीपक कोतेकर आणि भाजप युवती सरचिटणीस सायली कोतेकर यांनी राबवला उपक्रम

अंबरनाथ : सोसायटी मधील सहकाऱ्यांचे कोरोना व्हायरस पासून रक्षण करण्यासाठी प्रत्येकाने बाहेरून आल्यानंतर सॅनिटायजर फूट स्टँड चा वापर करून दोन्ही हात सॅनिटाईज करून आपल्या घरी किवा सोसायटी मध्ये प्रवेश करावा. जेणे करून कोरोना व्हायरस चा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मदत होईल. यासाठी भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष दीपक कोतेकर आणि भाजप युवती सरचिटणीस सायली कोतेकर यांनी प्रत्येक सोसायटीच्या आवारात सॅनिटायजर स्टॅन्ड उपलब्ध करून दिले आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचार बंदी मूळे बहुतेक सर्वच नोकऱ्या व्यवसाय बंद झाले आहेत. त्यामुळे महाराष्ट्राची आर्थिक घडी विस्कळीत झाली आहे. ती पूर्वपदावर येण्यासाठी सरकारने काही प्रमाणात लॉकडाऊन शिथिल केले आहे व करणार आहे. त्यामुळे नागरिकांना नोकरी व व्यवसायासाठी घराबाहेर पडावे लागणार आहे. त्यामुळे कोरोनाचा धोका वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
अंबरनाथ पूर्वेकडील प्रभाग क्र.४४ मधील प्रत्येक हौऊसिंग सोसायटीच्या नागरिकांचे कोरोना पासून रक्षण करण्यासाठी सॅनिटाईजरसह फूट स्टँड देण्यात आले आहेत. यामुळे प्रत्येक सोसायटी मधील नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की आपले व आपल्या सोसायटी मधील सहकाऱ्यांचे कोरोना व्हायरस पासून रक्षण करण्यासाठी प्रत्येकाने बाहेरून आल्यानंतर खाली ठेवण्यात आलेल्या फूट स्टँड चा वापर करून दोन्ही हात सॅनिटाईज करून आपल्या घरी किवा सोसायटी मध्ये प्रवेश करावा.जेणे करून कोरोना व्हायरस चा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मदत होईल. यासाठी काही मदत आवश्यक असल्यास भाजप उपाध्यक्ष दिपक रघुनाथ कोतेकर ९८८१३०४६३१ किंवा भाजपा युवती सरचिटणीस सायली कोतेकर यांच्याशी संपर्क साधावा.

 380 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.