माजी सैनिक अनंतराव मोरे यांचे निधन

१९७१ साली झालेल्या भारत पाकिस्तान युद्धात सहभागी झालेला लढवय्या सैनिक हरपला

अंबरनाथ : माजी सैनिक अनंतराव धाकटोजीराव मोरे ह्याचे अल्पशा आजाराने सोमवारी २० जुलैला उपचारा दरम्यान निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ६९ होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन मुली, सून, जावई आणि नातवंड असा परिवार आहे. दैनिक लोकमतचे छायाचित्रकार महेश मोरे हे त्यांचे चिरंजीव होत.
१९७१च्या भारत पाक युद्धात पाकिस्तानी सैनिकांना धूळ चारत भारताचा विजयी झेंडा रोवण्यात आला. या युद्धात अनंतराव मोरे हे सहभागी झाले होते. त्यावेळेस सरकारकडून पदक देऊन अनंतराव मोरे याना सन्मान करण्यात आला होता. आर्मीमधून सेवा निवृत्त झाल्यानंतर केंद्र सरकारच्या संरक्षण खात्यांतर्गत असलेल्या अंबरनाथ येथील ऑर्डनन्स फॅक्टरी येथे ते सेवेत होते. येथून ते निवृत्त झाले होते. आर्मीमध्ये सेवा झाल्याने अतिशय कडक शिस्तीचे असले तरी स्वभावाने अतिशय प्रेमळ होते. अतिशय मी बोलणारे आणि मनमिळावू असा त्यांचा स्वभाव होता. प्रत्येकाशी आपुलकीने वागत असत.

 410 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.