रोटरी क्लब ऑफ अंबरनाथ स्मार्ट सिटीच्या अध्यक्षपदी रेखा चौहान

सामाजिक उपक्रम राबविणार – रेखा चौहान


अंबरनाथ : रक्तदान शिबिराचा संयुक्त कार्यक्रम पार पडला असून लवकरच वृक्षारोपण उपक्रमही राबविण्यात येणार असल्याचे रेखा चौहान यांनी सांगितले आहे. अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत सर्व जुन्या नवीन सदस्यांचा सहकार्याने सामाजिक उपक्रम राबविण्याचा निर्धार नवनिर्वाचित अध्यक्षा रेखा चौहान व्यक्त केला आहे. अंबरनाथ रोटरी क्लब सारख्या समाजसेवी संस्थेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी मिळाल्याचा आनंद होत असून ही जबाबदारी यशस्वीपणे पार पाडण्यासाठी मी पूर्णवेळ काम करणार असल्याची प्रतिक्रिया रेखा चौहान यांनी दिली आहे.
रोटरी क्लब अंबरनाथ स्मार्ट सिटीच्या अध्यक्षपदाची सूत्रे रेखा चौहान यांनी स्वीकारली असून नवी कार्यकारिणीही जाहीर करण्यात आली आहे. येत्या वर्षभरात रोटरी क्लबच्या माध्यमातून राबविला जाणारा प्रत्येक उपक्रम रोटरीतील सहकारी यांच्या समवेत आणि रोटरीचे वरिष्ठ अधिकारी यांच्या मार्गदर्शनाने यशस्वीपणे राबवण्यासाठी मी काम करणार आहे असेही रेखा चौहान यांनी आपल्या प्रतिक्रियेत म्हटले आहे.
रोटरी क्लब ऑफ अंबरनाथ स्मार्ट सिटीच्या नवी कार्यकारिणीची ऑनलाईन बैठक अलीकडेच पार पडली. रोटरीचे प्रांतपाल डॉक्टर संदीप कदम यांनी ऑन लाईन मार्गदर्शन केले. या ऑनलाईन कार्यक्रमात रेखा चौहान यांनी रोटरी क्लब ऑफ अंबरनाथ स्मार्ट सिटीच्या अध्यक्षपदाची सूत्रे मावळते अध्यक्ष विशाल ठोंबरे यांच्याकडून स्वीकारली. यावेळी नवी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. नव्या कार्यकारिणीत राजेश देगावकर यांच्यावर सचिव पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. गोकुळ पाटील उपाध्यक्ष, संदीप पाटकर खजिनदार पद सांभाळणार आहेत. संगीता राजपाल सहसचिवपदी राहणार आहेत. सार्जंट ऑफ आर्ट साठी शरद महाकाळ. क्लब असिस्टंट म्हणून शीतल जोशी या काम पाहणार आहेत. मेंबरशिप साठी मधु यादव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पब्लिक रिलेशन शिपसाठी दिपाली अमीन यांना जबाबदारी देण्यात आली आहे. व्होकेशनल सर्व्हिससाठी डॉ. जयश्री मोरे, मेडिकल प्रोजेक्टसाठी अनिल दशपुते, नॉन मेडिकल प्रोजेक्टसाठी कैलास फळके, इंटरनेशनल सर्विसेससाठी दिलीप कोठावदे, प्रोजेक्टसाठी सारिका नागरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. टीआरएफसाठी अंकिता भागवत, थ्रस्ट एरियासाठी सुशांत कोठावदे, पोलिओसाठी अनिल दशपुते, विन्ससाठी नवनाथ शेळके, साक्षरतासाठी प्रकाश डावरे, सर्विस २० चेअरसाठी मधु मेनन, क्लब ट्रेनर विशाल ठोंबेरे, डिस्कॉन प्रमोशन साठी डॉ. अविनाश नारायणकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
रोटरी क्लब ऑफ अंबरनाथ स्मार्ट सिटीच्या माध्यमातून रक्तदान शिबिराचा संयुक्त कार्यक्रम पार पडला असून लवकरच वृक्षारोपण उपक्रमही राबविण्यात येणार असल्याचे रेखा चौहान यांनी सांगितले आहे.

 486 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.