आतापर्यंत १० हजार कोविड आणि कोविड संशयितांनी घेतले उपचार
कल्याण : कल्याण डोबिंवली मनपाने कोवीड उपचारासाठी १ एप्रिल पासून सुरु केलेले टाटा आमंत्रा कोवीड उपचार केंद्रातून आतापर्यंत सुमारे १० हजार कोवीड रुग्णांनी आणि कोविड संशयितांनी उपचार घेत कोरोनावर मात केली असून केडीएमसी क्षेत्रातील कोविड रुग्णांना हे कोविड सेंटर आधार ठरलं आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या वतीने पत्रकारांसाठी या कोविड सेंटरच्या पाहणी दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी हि माहिती देण्यात आली.
भिवंडी बायपास जवळ असलेल्या टाटा आमंत्रा मध्ये कल्याण डोंबिवली महानगर पालिकेने कोवीड संशयित रूग्णांसाठी सुसज्ज अशा २बी इमारती मध्ये २४५ रुममध्ये तब्बल ४९० बेडस सेवेसाठी तसेच २ए इमारती मध्ये १०८ रुम्स् मध्ये २१६ बेड तसेच कोवीड पाँझाँटिव्ह रूग्णांसाठी १७ फ्लोरमध्ये ८६२ रूम्स् १,७२४ बेडची व्यवस्था केली आहे. त्यामध्ये आवश्यकता भासल्यास आँक्सिजन सुविधा देखील उपलब्ध असून एकाचवेळेस कोवीड, कोवीड संशयित अशा सुमारे २४३० रुग्णांसाठी उपचाराची यंत्रणा सक्षमपणे रूग्णांवर उपचार करीत आहे.
या रुग्णांना कोरोना मुक्त करण्याचे काम अहोरात्र सुरू असुन संशयित कोरोना रूग्णांसाठी ग्रीन झोन तसेच कोवीड पाँझाँटिव्ह रूग्णांसाठी रेड झोन तयार करीत इगतवारीनुसार रूग्णांना दाखल करीत, उपचार करून डिस्चार्ज होईपर्यत यंत्रणा देखरेख करीत आहे. कोवीड पाँझाँटिव्ह रूग्णांसाठी १२ डॉक्टरांचे पथक सकाळ व रात्र पाळीत रूग्ण सेवा करीत रूग्णावर उपचार करतात. १ डॉक्टर ४ फ्लोरमधील रूग्णांची देखरेख करतात. या एका डाँक्टरांसह २ नर्स १ वार्डबॉय यांची टीम याठिकाणी कार्यरत असते.
येथील रुग्णांना गोळ्या औषधांसह बेडशीट, कोलगेट, साबण, खोबरेल तेल आदी जिवनावश्यक कीट रूग्णांना दिले जाते. रूग्णांना सकाळी चहा नाश्ता, दुपारी जेवण, संध्याकाळी चहा, रात्री जेवणाची मोफत सुविधा असून तेथील स्वच्छतेसाठी एकावेळी ४० कर्मचारी असे ३ शिफ्टमध्ये सुमारे १६० कर्मचारी कार्मचारी कार्यरत आहेत. परिसरात पोलीस यंत्रणेचा बंदोबस्त असुन खाजगी सुरक्षा रक्षक देखील येथे २४ तास तैनात असतात. सेवा, सुविधा बाबत मनपा आधिकारी कर्मचारी लक्ष देत अमंलबजावणी करीत आहेत.
डॉक्टर देखील रूग्णांशी संवाद साधत असून उपचार घेऊन घरी निघालेले रूग्ण डाँक्टरांचे आभार मानत आहेत. येथील स्वच्छता, जेवणाचा दर्जा उत्तम असल्याचे रूग्णांचे म्हणणे होते. एकंदरीत कोवीड रूग्णांच्या उपचारासाठी मनपाने प्रभावी पणे उपाययोजना राबविल्याचे चित्र आजच्या पत्रकार दौऱ्या दरम्यान टाटा आमंत्रा येथे यानिमित्ताने दिसत होते.
या दौऱ्यामध्ये पत्रकारांना मनपा सचिव संजय जाधव, उपसचिव किशोर शेळके, डॉक्टर दिपाली साबळे आणि त्यांचे सहकारी, कार्यकारी अभियंता घनश्याम नवांगुळ, उप अभियंता सुरेंद्र टेगळे, उप अभियंता प्रमोद मोरे, जनसंपर्क अधिकारी माधवी फोफळे आदींनी माहिती देत पत्रकारांसमवेत टाटा आमंत्रा कोवीड केअर सेन्टरची पाहणी केली.
560 total views, 1 views today