विद्यार्थी भारतीच्या कार्यकर्त्यांनी युजीसीची तिरडी सजवली व कॉनव्होकेशन कॅप घालून “विद्यार्थी त्रस्त है,युजीसी मस्त है” अशी घोषणा देत प्रेतयात्रा काढली.
कल्याण : गेले कित्येक दिवस विद्यार्थी भारती अंतिम वर्षाच्या परिक्षेसंदर्भात यूजीसीच्या विरोधात लढत आहे. वारंवार विद्यार्थी भारती विद्यार्थ्यांची बाजू मांडत आहे, विद्यार्थी गरिबीमुळे, कोरोनामुळे, बेरोजगारी मुळे, एकंदरीत या महामारीमुळे आलेल्या प्रत्येक अडचणीमुळे परीक्षा देण्याच्या मानसिकतेत नाहीत. हे सरकरला व युजीसीला का कळत नाही? लाखो विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात टाकणाऱ्या या युजीसीला भावना शून्य माणुसकि व मेलेलं धड म्हणून काल अमावस्येच्या रात्री विद्यार्थी भारतीच्या कार्यकर्त्यांनी युजीसीची तिरडी सजवली व कॉनव्होकेशन कॅप घालून “विद्यार्थी त्रस्त है,युजीसी मस्त है” अशी घोषणा देत प्रेतयात्रा काढली.
विद्यार्थी भारतीच्या राष्ट्रीय अध्यक्षा मंजिरी धुरी यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून संपूर्ण देशातील विद्यार्थ्यांशी संवाद साधला व संपूर्ण देशातील विद्यार्थ्यांनीया लढाईला पाठिंबा देत आजपासून ट्विटर भेजो मोहीमेत सामील होण्याचे आव्हान केले. विद्यार्थी भारती च्या राज्यध्यक्षा पूजा मुधाने यांनी सर्वच विद्यार्थ्यांच कौतुक करत जे या मोहिमेला पाठिंबा देत आपल्या हक्काच्या लढाईत ठाम पणे उभे आहेत व ही लढाई आपण जिंकूच असा सकारात्मक विचार मांडला.
499 total views, 3 views today