रिक्षा चालक,आशा वर्कर, घरकामगार महिलांना विजय नाहटा यांनी दिला मदतीचा हात

या कामगारांना तूर डाळ, कड धान्य मूग,साखर, हळद,आंघोळीचे आणि कपड्याचे साबण,मीठ,मिरची पावडर,खाण्याचे तेल,चहा पावडर इत्यादी जीवनावश्यक खाद्य पदार्थांचे वाटप करण्यात आले.

नवी मुंबई : कोरोना महामारीमुळे गेल्या चार महिन्या पासून देशासह महाराष्ट्र लॉक डाउन झाला आहे.अनेक गोरगरीब कुटुंबातील करता पुरुष घरात बसल्याने अनेक कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे.या लॉक डाउनच्या काळात ऑटो रिक्षा पुर्णतः बंद असल्याने तसेच घरकाम करणाऱ्या महिलांचे काम बंद असल्याने अनेकांना आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवणे कठीण झाले आहे.असे हे ऑटो रिक्षा चालक आणि घरकामगार महिला यांनी आपली व्यथा शिवसेना कामगार विभागाचे उपशहर प्रमुख प्रदीप बी.वाघमारे यांच्याकडे मांडली. सदर गोरगरीब रिक्षा चालक व घरकामगार महिलांची व्यथा शिवसेना उपनेते विजय नाहटा यांच्याकडे कथन केली असता नाहटा यांनी या गोरगरीब कुटूंना मदतीचा हात दिला. तुर्भे नाका येथील ऑटो रिक्षा चालक व घर कामगार महिलांना किराणा मालाचे तात्काळ वाटप करण्याचे आदेश दिले.या कामगारांना तूर डाळ, कड धान्य मूग,साखर, हळद,आंघोळीचे आणि कपड्याचे साबण,मीठ,मिरची पावडर,खाण्याचे तेल,चहा पावडर इत्यादी जीवनावश्यक खाद्य पदार्थांचे वाटप करण्यात आले.
लॉक डाउनच्या काळात गोरगरिबांना नाहटा यांनी अनेक वेळा मदत केल्यामुळे व आजही ऑटो रिक्षा चालक,घरकामगार महिला तसेच आशा वर्कर यांना जीवनावश्यक अन्नपदार्थांचे वाटप केल्याने सर्व नागरिकांनी नाहटा यांचे आभार मानले आहेत.

 475 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.