विद्यार्थ्यांचे या वर्षातील हे दुसरे रक्तदान शिबीर आहे.
अंबरनाथ : गजानन महाराज सेवा मंडळ आणि एस आय सी इ एस महाविद्यालयातील (१९८७) दहावीच्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या रविवार , २६ जुलै रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती गजानन महाराज सेवा मंडळाचे अध्यक्ष संजय दलाल आणि माजी विद्यार्थी दीपक रेवणकर व मुकेश विसपुते यांनी दिली आहे.
गजानन महाराज उपासना केंद्र, स्टेशन विभाग अंबरनाथ पूर्व येथे रविवार २६ जुलै रोजी सकाळी दहा ते दुपारी दोन यावेळेत हे रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले आहे. कोरोनाच्या या पार्श्वभूमीवर हे रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले असल्याने सुरक्षित अंतर राखणे अत्यंत महत्वाचे असल्याने रक्तदान करू इच्छिणाऱ्या दात्यांनी आपले नाव नोंदणी करून वेळ ठरवून घेणे अपेक्षित आहे. सहा सहाच्या गटाने रक्तदात्यांना रक्तदान करता येणार आहे.
कोरोनाच्या या संकट काळात थॅलेसेमिया ग्रस्त रुग्णांना रक्ताची फार चणचण भासत आहे. त्यांना सहज रक्त उपलब्ध व्हावे यासाठी अंबरनाथ मधील एस आय सी इ एस महाविद्यालयातील १९८७ च्या दहावीच्या बॅच मधील सर्व माजी विद्यार्थी एकत्र येऊन या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. घाटकोपर येथील समर्पण ब्लड बँक सर्वोदय हॉस्पिटलची टीम यासाठी सहकार्य करणार आहे. या विद्यार्थ्यांचे या वर्षातील हे दुसरे रक्तदान शिबीर आहे.
या रक्तदान शिबिरात जास्तीत जास्त रक्तदात्यांची सहभागी होऊन थॅलेसेमिया ग्रस्त रुग्णांना दिलासा द्यावा असे आवाहन गजानन महाराज सेवा मंडळाचे अध्यक्ष संजय दलाल आणि माजी विद्यार्थी दीपक रेवणकर, मुकेश विसपुते यांनी केले आहे.
अधिक माहिती आणि नाव नोंदणी साठी अरुण डोंगरे 9325045116, दीपक रेवणकर 9881245204, ज्योती प्रसाद 9867726554, मुकेश विसपुते 9867655009, निर्मला बोन्डाळे 8600563033, राजेश सिंग 9322879890 यांचेशी संपर्क साधावा.
512 total views, 1 views today