पोलीस प्रशासनाकडे दाद मागणारी मुलुख मैदानी तोफ अशी जन सामान्यतः त्यांची प्रतिमा होती
कल्याण : समाजातील तळागळातील सर्वसामान्यांपासुन शिवसैनिक पर्यंत नाळ असणारे शिवसेना कल्याण विधानसभा क्षेत्र संघटक दिपक सोनाळकर यांचे रविवारी अल्पशा आजाराने निधन झाल्याने समाजातील सर्वच स्तरातुन तमाम शिवसैनिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
सर्वांच्या मदतीला धावणारे तसेच शिवसेनेच्या आंदोलने मोर्चे यामध्ये सक्रिय राहत. कल्याण तालुक्यातील ग्रामीण व शहरी भागातील तमाम शिवसैनिकाशी नाळ बांधत त्यांच्या आडचणीला दिवसा रात्री धावणारे दिपक सोनाळकर यांचे रविवारी वयाच्या ७२ वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले. शिवसेनाचा ढाण्या वाघ म्हणुन पोलीस प्रशासनाकडे दाद मागणारी मुलुख मैदानी तोफ अशी जन सामान्यतः त्यांची प्रतिमा होती. शिवसेना कल्याण तालुका प्रमुख, परिवहन समिती सदस्य ते शिवसेना कल्याण विधानसभा क्षेत्र संघटक अशी पदे त्यांनी शिवसेनेचे काम करीत असताना भुषविली. ग्रामीण टच असलेला शिवसेना पदाधिकारी म्हणून त्यांची वेगळी ओळख होती. त्यांच्या पश्चात आई, पत्नी एक मुलगा, सुन, एक मुलगी जावई नातवंडे असा परिवार आहे.
657 total views, 1 views today