केडीएमसीच्या फीडबॅक कॉलसेंटरला रुग्णांचा चांगला प्रतिसाद


फीडबॅक कॉलसेंटर माध्यमातून ७० हजार काँल करून वाढविले  रूग्णांचे मनोबल

कल्याण : घरच्या घरी विलगीकरणात राहणाऱ्या होम आयसोलेशनच्या यादीतील पॉझिटिव्ह रुग्णांसाठी महापालिकेने २६ जुन पासून प्रायोगिक तत्वावर फीडबॅक घेण्यासाठी कॉल सेंटरची सुविधा सुरू केलेली आहे.
८०६८७१३०५५ या  दूरध्वनी क्रमांकावरून आयसीएमआर यादीतील पॉझिटिव्ह सौम्य लक्षणे असलेल्या  रुग्णांना फोन केला जातो व त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली जाते. सदर फीडबॅक सिस्टमला चांगला प्रतिसाद मिळाल्यामुळे आता ही कॉल सेन्टरची सुविधा पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्यात आलेली आहे.  रुग्णाला तातडीने वैद्यकीय उपचाराची गरज लागली तर या कॉल सेंटर मार्फत आरोग्य विभागास कळविले जाऊन सदर माहिती संबंधित नागरी आरोग्य केंद्राला दिली जाते,त्यामुळे रुग्णाला मदत पुरविणे शक्य होते. या कॉल सेंटर मधून आतापर्यंत सुमारे ७० हजार  कॉल करण्यात आलेले आहेत.
या दूरध्वनी  क्रमांकावरून रुग्णाला आपुलकीने प्रकृतीची विचारपूस करण्याबाबत फोन केला जात असल्यामुळे रुग्णाचे मानसिक मनोबल वाढून त्याची प्रकृती बरी होण्यास मदत होत आहे. तरी होम आयसोलेशन केलेल्या रुग्णाला वरील संपर्क क्रमांकावरून, कॉल सेन्टरमार्फत फोन आल्यास न घाबरता प्रतिसाद द्यावा व संपर्क साधणारी व्यक्ति महापालिकेने नियुक्त केली असल्याने सदर व्यक्तीस खरी माहिती देऊन महापालिकेस सहकार्य  करावे असे आवाहन महापालिकेमार्फत करण्यात आले आहे.

 376 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.