डोंबिवली येथे राहणारा हा रुग्ण कोरोना पाँझाँटिव्ह असल्याने टाटा आमंत्रा येथे रुम नं ९१७ मध्ये उपाचारार्थ दाखल होता
कल्याण : कल्याण भिवंडी रोडवरील रांजनोली बायपास नाका लगत असणाऱ्या टाटा आमंत्रा कोवीड सेंटर मध्ये कोरोना पाँझाँटिव्ह रुग्णांने पाचव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना रविवारी साडेचार च्या सुमारास घडल्याने एकच खळबळ उडाली आहे.
डोंबिवली येथे राहणारा हा रुग्ण कोरोना पाँझाँटिव्ह असल्याने टाटा आमंत्रा येथे रुम नं ९१७ मध्ये उपाचारार्थ दाखल होता. रविवारी साडेचारच्या सुमारास त्याने पाचव्या मजल्यावरून उडी मारल्याने त्यांचा जागीच मुत्यु झाल्याची दुर्दैवी घटना घडली. पाचव्या मजल्यावरुन उडी मारून आत्महत्या करण्यापुर्वी त्याने तो दाखल असलेल्या ९ मजल्यावरील ९१७ रूम मधुन उडी मारण्याचा प्रयत्न केला असवा तेथुन उडी मारण्यास जमत नसल्याचे पाहत खाली येत पाचव्या मजल्यावरुन उडी मारून आत्महत्या केल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली असुन या रुग्णाने का आत्महत्या केली ह्याचे गूढ पोलीस तपास अंती बाहेर येईल.
721 total views, 1 views today