रस्त्यावर भाजीपाला विक्रीला मनाई

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने घेतला निर्णय

बदलापूर : बदलापुर शहरातील रस्त्यावर सुरू असलेली भाजीपाला विक्री बंद होणार आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रस्त्यावर सुरू असलेली भाजी विक्री बंद करण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती बदलापूर पालिकेचे प्रशासक व उपविभागीय अधिकारी जगतसिंह गिरासे यांनी दिली आहे.
कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी रस्त्यावरील गर्दी कमी करण्यासाठी रस्त्यावर भाजीपाला विक्रीला बंदी करण्यात येणार असल्याचे तसेच भाजी मार्केट बंद ठेवण्यात येणार असल्याचे जगतसिंग गिरासे यांनी सांगितले. त्याचबरोबर कॉम्प्लेक्स समोर विक्रेत्यांना विक्रीची परवानगी देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. एका कॉम्प्लेक्ससमोर एक किंवा दोन विक्रेते सुरक्षित अंतर व इतर नियमांचे पालन करून विक्री करू शकणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या भाजी विक्रेत्यांनी त्यांना ज्या शेतकरी वा घाऊक विक्रेत्यांकडून भाजीपाला खरेदी करायचा असेल तो त्यांनी ज्याठिकाणी विक्री करायची असेल त्याठिकाणी मागवून घेण्यात यावा, असेही गिरासे यांनी सांगितले.

 407 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.