बदलापूर मध्ये कोविड टेस्ट सेंटरची सुविधा

दररोज सुमारे दोन हजार रुग्णांची चाचणी मोफत होणार

बदलापूर : कोरोना टेस्टसाठी अद्यापही मुंबईवर अवलंबून रहावे लागत आहे. मात्र आता लवकरच बदलापुर शहरात कोविड टेस्ट सेंटर सूरु होणार आहे. त्यामुळे रिपोर्टसाठी होणारा विलंब टळून रुग्णांवर तातडीने उपचार करणे शक्य होणार आहे. पालिकेचे प्रशासक जगतसिंह गिरासे यांनी ही माहिती दिली.
बदलापूर पूर्वेकडील गावदेवी भागातपालिकेच्या इमारतीत हे कोविड टेस्ट सेंटर सुरू होणार आहे. याठिकाणी दररोज सुमारे दोन हजार रुग्णांची चाचणी मोफत होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. बदलापूर व अंबरनाथ शहर तसेच अंबरनाथ ग्रामीण भागातील नागरिकांसाठी हे कोविड टेस्ट सेंटर असेल. जेजे रुग्णालयात कोविड टेस्ट सेंटरची उभारणी करणारी संस्था बदलापूर शहरात कोविड टेस्ट सेंटर उभारणार आहे. नगर परिषदेने त्यांना मनुष्यबळ उपलब्ध करून द्यायचे आहे. यासाठी उल्हासनगर येथील एका पॅरामेडिकल संस्थेशी यासंदर्भात संपर्क करण्यात आला असून त्यांच्याकडून हे मनुष्यबळ उपलब्ध करण्यात येणार असल्याचे प्रशासक जगतसिंह गिरासे यांनी स्पष्ट केले.

 407 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.