पालक व शिक्षकांसाठी राज्यस्तरीय वेबीनार संपन्न

भाजपा शिक्षक आघाडी कोकण विभागाने केले होते आयोजन  

कल्याण : खास पालक व शिक्षकांसाठी राज्यस्तरीय ऑनलाईन फ्री वेबीनार-२०२० च्या दुस-या विचारपुष्पाचं उद्घाटन भाजपा शिक्षक आघाडी कोकण विभागाचे सल्लागार, आमदार रविंद्र चव्हाण यांनी उपस्थितांशी संवाद साधत, केलं. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं स्वप्न आहे की, आत्मनिर्भर व्हा. क्षेत्र कोणतंही असो, शिक्षणाचं असो की संशोधनाचं,कृषीचं असो की उद्योगाचं की आणखी कुठलंही पण आत्मनिर्भर भारताचं स्वप्न आपण सर्व मिळून साकार करु या. याकामी शिक्षकांची भुमिका फार महत्वपुर्ण आहे. मी स्वतः आणि कोकण पदवीधर मतदार संघाचे आमदार निरंजन डावखरे तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू असं देखील सुचविलं.
नवनिर्मितीक्षम शिक्षण ही काळाची गरज गुंफण्यासाठी महाराष्ट्राचे माजी शिक्षण संचालक गोविंद नांदेडे यांनी संवाद साधतांना परंपरागत शिक्षणपध्दतीला फाटा देत स्रुजनशीलतेला, नवनिर्मिती क्षमतेला, नाविन्यतेला, सर्जनशीलतेला, कल्पक विचारांना आणि कृतीला वाव देणा-या आधुनिक शिक्षणपध्दतीचा स्विकार करु या आणि तीच काळाची गरजही आहे अस ठाम मत व्यक्त केलं. विद्यार्थ्याच्या अंतरंगी असलेली कृतीशीलता, कल्पकता, सर्जनशीलता,प्रयोगशीलता आणि उपक्रमशीलता यांना वाव देणारं शिक्षण हाच शिक्षणाचा मुळ पाया ठरणार आहे असे सांगितले.
या वेबीनारचं सूत्रसंचालन विकास पाटील यांनी केलं. समारोपप्रसंगी ऋणनिर्देशन ठाणे ग्रामीण जिल्हा संयोजक जगदीश पाटील यांनी ओघवत्या शैलीत सादर केलं. या दुस-या विचारपुष्पाला सुमारे ५५० हून अधिक रसिक श्रोत्यांनी उपस्थिती दर्शविली. सदर वेबीनारच्या यशस्वीतेसाठी संयोजन समिती सदस्य विनोद शेलकर, जगदीश पाटील, संदिप कालेकर,सिंधू शर्मा, प्रकाश स़ोनार,मिलिंद विखारे यांचं सक्रिय सहकार्य लाभलं.

 339 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.