विश्वसनीयतेसाठी खारेगाव भागात टॉरंट पॉवरने राबवले देखभाल , दुरुस्ती अभियान

ग्राहकांना उत्तम दर्जाची सेवा देण्यासाठी कटिबद्ध असल्याची कंपनीची ग्वाही

ठाणे : गेल्या काही आठवड्यांत खारेगाव आणि पारसिक नगर परिसराकडून टोरंट पॉवरला वीजपुरवठा खंडित होण्याच्या अनेक तक्रारी मिळाल्या होत्या. टोरंट पॉवर लिमिटेडने १ मार्च २०२० पासून शिल-मुंब्रा-कळवा येथे महावितरणची वितरण फ्रेंचाइजी म्हणून काम सुरू केले आहे. क्षेत्रातील वीज नेटवर्कचे काही कमकुवत ठिकाणे होती आणि नेटवर्क देखभाल, दुरुस्ती आवश्यक होती. परंतु टेकओव्हर नंतर कोविड लॉकडाऊन लागू झाल्यामुळे, मुळात टीपीएलने बनविलेले उपक्रम शक्य झाले नाही वा आवश्यक तशी देखभाल कार्य करता आले नाही.
ग्राहकांच्या या तक्रारींची दखल घेणे आणि काही ओळखल्या गेलेल्या कमकुवत नेटवर्क पॉईंट्सवर कायमस्वरूपी तोडगा काढणे यासाठी टॉरेंट पॉवरने आज खारेगाव आणि पारसिक नगर परिसरासाठी देखभाल दुरुस्तीची मोठी योजना आखली. परिसरातील ग्राहकांना आगाऊ सूचना देण्यात आली व सकाळी १० ते संध्याकाळी ५.०० या वेळेत आउटेज घेऊन ही नियोजित कामे करण्यात आली. यावेळी १२ टोरंट टीम्स द्वारे समांतर कार्य करण्यात आले आणि देखभाल, दुरुस्ती चे सगळे काम करण्यात आले:
झाड ट्रिमिंग, डीओ सेट बदली, पिन इन्सुलेटर बदली, व्ही क्रॉस आर्म बदली, जम्पर तपासणी आणि बदली, एलटी केबल बदली, दोन ठिकाणी आरएमयू स्थापना इत्यादीं च्या देखभाल दुरुस्तीसाठी घेतलेल्या क्षेत्रात ५१ ट्रान्सफॉर्मर्स आणि सुमारे १०००० ग्राहकांचा समावेश आहे. कामाच्या साइटवर हजर असलेल्या आणि टॉरेन्ट पॉवर कामाचे साक्षीदार असलेल्या काही ग्राहकांनी टॉरंट पॉवर प्रयत्नांचे आणि कामाच्या गुणवत्तेचे कौतुक देखील केले.
टॉरंट पॉवरने आश्वासन दिले आहे की त्यांची टीम शील-मुंब्रा-कळवा भागात वीजपुरवठा विश्वासार्हतेत आणखी सुधारणा करण्यासाठी सर्व प्रयत्न करीत आहे. टॉरंट पॉवर नेहमीच ग्राहकांना सुरळीत व सुरक्षित वीज पुरवठा करण्यास कटिबद्ध आहे व या दिशेने सदैव प्रयत्नशील राहील.

 516 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.