३ जणांनी मिळवले ७० टक्क्यांहून अधिक मार्क्स
कल्याण : वे टू लाईफ या सामाजिक संस्थेतील निराधार अनाथ मागासवर्गीय ४ मुलांपैकी ३ मुले ७० टक्क्यांनी पास झाले. कोणतीही महागडे क्लासेस लावल्या शिवाय मुलांनी खूप मेहनत करून परिस्थितीवर मात करून १२ वी परीक्षेत चांगल्या मार्कांनी पास होऊन यश संपादन केले आहे.
हि संस्था गेल्या २० वर्षांपासून वंचित, मागासवर्गीय, गरीब अनाथ, निराधार, आदिवासी मुले मुलींना समाजाच्या मुख्यप्रवाहात आणण्यासाठी कल्याण, ठाणे, पालघर जिल्ह्यात संस्था कार्यरत आहे. जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. राजु राम व बेटी बचाओ बेटी पढाओ जिल्हा संयोजक ऍड सौ. शिल्पा राम यांनी दत्तक घेतलेले, त्यांच्या मार्गदर्शनाने व सहकार्याने हे सामाजिक कार्य अविरत अखंड चालू आहे. या मुलांना मोफत शिक्षण, प्रशिक्षण, कपडे, महिन्याचे अन्नधान्य राशन, आरोग्य सेवा, पुनर्वसन सहकार्य मदत करीत आहे.
या मुलांना आयएएस, आयपीएस, सनदी अधिकारी, डॉक्टर, इंजिनियर आदी शिक्षण देण्याचा उद्देश असून “गरिबाला दुसरे काहीही देऊ नका फक्त जेवण आणि सर्वात महत्वपूर्ण शिक्षण द्या व मग बघा समाज आपोआपच प्रगतशील होईल आणि आपल्या भारत देशाची उन्नती होईल अशी प्रतिक्रिया यावेळी सामाजिक कार्यकर्ते डॉ. राजु राम यांनी दिली.
563 total views, 2 views today