पर्यावरण संवर्धनासाठी डिझायर फाउंडेशनची अनोखी स्पर्धा

फोटो विथ ट्री या स्पर्धेत १० वर्षांपर्यंतची मुलं मुली यांना सहभागी होता येणार आहे

कल्याण : पर्यावरणाचे महत्त्व लहान मुलांना कळावे आणि पर्यावरण संवर्धन व्हावे या उद्देशाने कल्याण मधील  डिझायर फाउंडेशनने अनोखी स्पर्धा आयोजित केली आहे. या उपक्रमात पालकांनी आपल्या लहान मुलांना पर्यावरणाचे महत्त्व समजवून देत एक रोपट आपल्या मुलांच्या हस्ते लावायचे आहे व त्याचा फोटो संस्थेला पाठवायचे आहेत. फोटो विथ ट्री या स्पर्धेत १० वर्षांपर्यंतची मुलं मुली यांना सहभागी होता येणार आहे. हे रोपट घरातील कुंडीत लावले तरी चालणार आहे.     तर येत्या १५ ऑगस्टला  स्वतंत्र भारताला ७३ वर्ष पूर्ण होणार आहेत. त्या निमित्त सर्व वयोगटातील  व्यक्तींसाठी  लेखन स्पर्धा देखील आयोजित केली आहे. क्रांतिकारी आणि भारत हा या लेखन स्पर्धेचा विषय असून आपल्या भारत देशाला स्वातंत्र मिळवून देण्यासाठी ज्या क्रांतिकारकांनी योगदान दिले त्याबद्दलची माहिती लोकांपर्यंत पोहचवणयासाठी हि स्पर्धा आयोजित केली आहे. या दोन्ही स्पर्धांचे फोटो आणि लेख १० ऑगस्ट पर्यंत ८६५५१५७५६४ या नंबरवर अथवा desirefoundation01@gmail.com या ईमेल वर पाठवायचे आहेत.  सर्व  सहभागी स्पर्धकांना कडून डिझायर फाउंडेशनतर्फे ई सर्टिफिकेट देण्यात येतील. तर सर्वोत्कृष्ट लेखनाला पारितोषिक देण्यात येईल अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष कमलेश भोईर यांनी दिली.

 388 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.