कोरोनाची साखळी तोडण्यासाठी विनामूल्य चाचणीचे आयोजन

जादा पैसे आकरण्यात येत असल्यामुळे वाढत होती संसर्गाचा भीती

ठाणे : ठाण्याच्या पूर्व परिसरात असलेल्या गरीब नागरिकांसाठी कोरोनाची चाचणी विनामूल्य करण्यात आली आहे. सबअर्बन डायग्नोस्टिक सेंटर आणि तारामाऊली सामाजिक संस्थेच्या माध्यमातून पिवळ्या-केशरी रेशनकार्ड धारकांना या मोफत कोरोना चाचणी लाभ होणार आहे. ठाण्यात प्रथमच खाजगी लॅबच्या माध्यमातून कोरोनाच्या चाचणीला सुरुवात झाली असल्याने नागरिकांमध्ये समाधानकारक वातावरण निर्माण झाले आहे.
कोरोनाच्या काळात व्यवसाय तसेच काम बंद असल्यामुळे हातावर पोट असलेल्या नागरिकांना आर्थिक परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. त्यातच या आजारामुळे आर्थिक गणित कोलमडले असून कोरोनाची टेस्ट करण्यासाठी नागरिकांना विचार करावा लागत असल्यामुळे नागरिकांसाठी विनामूल्य कोरोना चाचणी ठेवण्यात आली आहे.
ठाण्यात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असून पूर्व भागात असलेल्या कोपरी परिसरात गल्लोगल्ली मोठ्या प्रमाणावर रुग्ण आढळून येत आहेत. याच पार्श्वभूमीवर कोरोना रोखण्यासाठी पालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधी सर्वोतोपरी पर्यन्त करीत आहेत. प्रामुख्याने हा प्रभाग झोपडपट्टी तसेच काहीसा उच्चभ्रू लोकवस्तीचा ओळखला जात असून याठिकाणी गरीब नागरिक मोठ्या प्रमाणावर वास्तव करीत आहेत. कोरोनाची साखळी रोखण्यात यश मिळावे यासाठी नागरिकांनी घाबरून न जाता कोरोनाची टेस्ट करावी असे आवाहन आयोजक भरत चव्हाण यांनी केले आहे. एकीकडे कोरोनाच्या परिस्थितीत खासगी रुग्णालयात भरमसाठ पैसे आकरण्यात येत असून चाचणीसाठी देखील हजारो रुपये मागितले जातात. गरीब नागरिकांना हे शक्य नसल्यामुळे काहीजण टेस्ट देखील करीत नाहीत. त्यामुळे संसर्ग वाढण्याची भीती व्यक्त होत असल्यामूळे नागरिकांना घराबाहेर पडून विनामुल्य कोरोना चाचणीचा लाभ असे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान ठाण्यात सर्व ठिकाणी मोफत चाचणी शिबिराचे आयोजन करण्यात येणार असल्याचे यावेळी आयोजक भरत चव्हाण यांनी सांगितले.

 392 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.