त्या विद्यार्थीनीचे उपोषण १० दिवसांसाठी स्थगित

राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केली मध्यस्थी

उपोषण स्थगित झाले तरी आंदोलन चालू राहणार : मंजिरी धुरी

कल्याण : खासदार म्हणून मी पूर्ण प्रयत्न करेन  आणि अंतिम सत्राची परीक्षा होऊ न देण्याचा मी प्रयत्न करेन  आपण उपोषण सोडावे या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी फोन वरून केलेल्या विनंतीचा मान ठेवून आणि स्वतः राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे हे शिक्षणमंत्री उदय सामंत यांच्या आदेशावरून उपोषण स्थळी आल्यावर, त्यांनी केलेल्या आग्रहामुळे विद्यार्थी भारती राष्ट्रीय अध्यक्षा मंजिरी धुरी यांनी १० दिवसासाठी उपोषण स्थगित केले. लढाई अजून संपली नाही असा इशारा सुद्धा धुरी यांनी दिला आहे.
  युजीसी उपाध्याक्ष पटवर्धन यांनी, अंतिम सत्रातील विद्यार्थ्यांच्या परीक्षेला सक्ती करण्याचा निर्णय घेतल्याच्या विरोधात मंजिरि धुरी यांनी अनेक आंदोलन केल्या नंतर मेल, ट्विट, मेसेज पाठवल्या नंतरही काहीच प्रतिक्रिया आली नाही. म्हणून स्वतःचे प्राण पणाला लावायचा निश्चय करत आमरण उपोषण सुरू केले. आमरण उपोषणाचा पहिलाच दिवस असताना उदय सामंत यांनी तातडीने राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांस दूत म्हणून पाठवले. राज्यमंत्री तनपुरे व खासदार सुप्रिया सुळे यांनी थोड्या दिवसाची मुदत मागून उपोषण सोडण्याचा आग्रह धरल्याने १० दिवसांची मुदत देऊन आंदोलन स्थगित केले असल्याचे धुरी यांनी सांगितले. 

 351 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.