पनवेलमधील क्वारंटाईन सेंटरमध्ये दाखल करण्यात आलेल्या एका महिलेवर क्वारंटाईन असलेल्याच एका युवकाने बलात्कार केल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे
पनवेल : संपूर्ण जग सध्या कोरोनाच्या महामारीवर मात करण्यासाठी झगडते आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासन वेगवेगळ्या उपाययोजना राबवत आहे. या नुसारच पनवेल आणि नवी मुंबई परिसरातील कोरोना संशंयीतांना किंवा हाय रिस्क लोकांना क्वारंटाईनची व्यवस्था कोण गाव येथील इंडिया बुल्स येथे करण्यात आली आहे. या इमारतीतच हा धक्कादायक प्रकार समोर आला.
संबधित प्रकार गुरूवारी मध्यरात्री घडल्याचा खुलासा सूत्रांकडून सांगण्यात येत असून क्वारंटाईन सेंटमध्येच कोरोना संशयीत म्हणून दाखल झालेल्या एका महिलेवर एका विकृत तरुणाने बलात्कार केल्याची माहिती पनवेल तालुका पोलिस ठाण्याच्या वतीने देण्यात आली आहे.
पोलिसांनाी याबाबत तत्काळ कारवाई करत कलम ३७६ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पनवेल पोलिस अधिक तपास करीत आहेत..
539 total views, 1 views today