क्रीडा शिक्षकांना मिळणार मोफत रेशन

काही क्रीडा शिक्षक सध्या भाजीची गाडी लावणे, पेपर टाकणे, रिक्षा चालवणे, होमगार्ड अशी मिळेल ती कामे करून आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करत आहेत

कल्याण : मुंबई, ठाणे व पालघर जिल्ह्यातील क्रीडा शिक्षक व प्रशिक्षक यांचे एप्रिल मे पासूनचे शाळेने वेतन बंद केलेले आहे. परिणामी अनेक शिक्षकांवर सध्या उपासमारीची वेळ आलेली आहे. अशा गरजू शिक्षकांच्या मदतीसाठी कल्याणातील क्रीडाप्रेमी संतोष पाठक व अविनाश ओंबासे पुढे सरसावले असून
ज्या क्रीडा शिक्षक व प्रशिक्षकाची परस्थिती सध्या एकदमच बिकट अशा काही क्रीडा शिक्षकांना मदत देण्यात येणार आहे.
लॉक डाउन नंतर बऱ्याच क्रीडा शिक्षकांना काही शाळांनी सक्तीने घरी बसले होते
अशा काही क्रीडा शिक्षकांनी सध्या भाजीची गाडी लावणे, पेपर टाकणे, रिक्षा चालवणे, होमगार्ड अशी मिळेल ती कामे करून आपल्या परिवाराचां उदरनिर्वाह करत आहेत. त्यांना थोडीफार मदतीचा हात म्हणून स्पोर्ट्स हेल्प फाउंडेशन च्या माध्यमातून हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमा अंतर्गत  क्रीडा शिक्षकाना दहा किलो गहू, पाच किलो तांदूळ, एक किलो तूरडाळ, एक किलो तेल, एक किलो मीठ, एक किलो साखर, एक किलो शेगदाने, डाबर च्यवनप्राश, मध, ईम्यूनीटी पवार रियल ज्यूस, टूथपेस्ट, हेअर ऑइल, हळदी- मिर्ची मसाला व साबण या महत्त्वाच्या  जीवनावश्य वस्तू चे वाटप २१ जुलै रोजी आमदार  कार्यालय, तिसगाव नाका, कल्याण पूर्व, येते होणार आहे.  सर्वश्री कल्याण पूर्वचे आमदार गणपतशेठ गायकवाड , कल्याण पश्चिमचे आमदार  विश्वनाथदादा भोईर, कल्याण पूर्व भाजपा अध्यक्ष
संजय मोरे, क्रीडा संघटक संदीप ओंबासे, पिस्वलीचे शिवसेना विभाग प्रमुख रक्कुभाई शर्मा, समाजसेवक उदयशेठ गायकवाड , पालघर जिल्हा त्वांयक्वादो चे अध्यक्षअजयभाई पांडे, मुबंई भाजपाचे पदाधिकारी किशोरभाई मनीयाल, समाजसेवक विजयभाई पंडित  कल्याण तालुका शारीरिक शिक्षण व शिक्षक मंडळाचे लक्ष्मण इंगळे, उदय नाईक, गुलाबराव पाटील, प्रताप पगार, जगदीश उगले मुख्याध्यापक जोंधळे हायस्कूल,  नरेंद्र राणे सेवानिवृत्त क्रीडाशिक्षक, बळीराम साळुंखे क्रीडाशिक्षक, रेणुका पिसे – क्रीडा शिक्षिका, भास्कर ढवळे क्रीडाशिक्षक, दीपक बिरारी क्रीडाशिक्षक, आर एस पी अधिकारी शिक्षक युनिट कल्याण डोंबिवली मनिलाल शिंपी,(कमांडर), अनिल बोरनारे, कैलास पाटील, जितेंद्र सोनवणे, बन्सीलाल महाजन, तुषार बोरसे, अनंत किनगे, बापू शिंपी, दिलीप पावर, रितेश पाटील, नितिन पाटील, रोड सेफ्टी कमांडर बद्रीनारायण मिश्रा या सर्वांचे अन्नदाते म्हणून या उपक्रमाला मोलाचे सहकार्य व मदत लाभली आहे.

 711 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.