यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया विद्यार्थी-पालकांना स्वतः करायची आहे.
कल्याण : नुकताच बारावीचा निकाल लागला असून दहावीच्या निकालाची उत्सुकता वाढली आहे. शिक्षण संचालक पुणे यांनी अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया पत्रकाद्वारे जाहीर केली असून दरवर्षी अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया शाळा व केंद्र स्तरावरून पुर्ण केली जात होती. यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया विद्यार्थी-पालकांना स्वतः करायची आहे.
माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष गुलाबराव पाटील यांनी सांगितल्याप्रमाणे अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया तीन टप्प्यात होत आहे. पहिल्या टप्प्यात विद्यार्थ्यांचा नोंदणी प्रवेश अर्जाचा सराव व्हावा म्हणून मंडळाने तात्पुरते प्रारुप संकेतस्थळ उपलब्ध करून दिले आहे. Mock.Demo.Registration या संकेतस्थळावर २४ जुलै पर्यंत सराव अर्ज विद्यार्थी व पालकांनी स्वतः भरायचा आहे. २४ जुलै नंतर ही माहिती संकेतस्थळावरून नष्ट केली जाईल.
२६ जुलै पासून विद्यार्थी स्वतः किंवा पालकांच्या मदतीने मूळ संकेत स्थळ https://mumbai.11thadmission.org.in या नोंदणी संकेतस्थळावर नोंदणी अर्ज एक भरतील. आपल्या अर्जातील माहिती प्रमाणित करण्यासाठी शाळा व मार्गदर्शन केंद्र निवडतील दुसऱ्या टप्प्यात दिनांक २७ जुलै पासून संबंधित शाळा व मार्गदर्शन केंद्र विद्यार्थ्यांकडून आलेले फॉर्म व्हेरिफाय करतील. फॉर्ममध्ये काही त्रुटी किंवा बदल असल्यास विद्यार्थ्यांशी संपर्क साधून पूर्ण करतील.
तिसऱ्या टप्प्यात इयत्ता दहावीचा निकाल लागल्यावर प्रवेश अर्ज चा दुसरा भाग विद्यार्थी किंवा पालक यांनी शाळा मार्गदर्शन केंद्राच्या मदतीने आपल्याला हवे त्या कॉलेजला पसंतीक्रम देऊन प्रवेश फॉर्म भरायचा आहे. याबाबतचे वेळापत्रक दहावीचा निकाल ऑनलाइन लागल्यावर जाहीर होणार आहे. पालक व विद्यार्थ्यांनी Mock.Demo.Registration वरती प्रवेश अर्जाचा सराव करून 26 जुलै पासून https://mumbai.11thadmission.org.in, या संकेतस्थळावर जाऊन आपला नोंदणी प्रवेश अर्ज भरून घेण्याचे आव्हान मुख्याध्यापक गुलाबराव पाटील यांनी केले आहे.
4,232 total views, 1 views today