त्या २७ गावांची नगरपालिका बनवा


मनसेचे आमदार राजू पाटील यांची जिल्हा आणि राज्य शासनाकडे मागणी

कल्याण : २०१५ साली काढलेल्या अधिसूचनेचा पुनर्विचार करून कल्याण डोंबिवलीतील २७ गावांमधून ९ गाव वगळून नगरपरिषद न बनविता वगळलेल्या उर्वरित ९ गावांचा सामावेश करून २७ गावांची नगरपालिका बनवावी अशी मागणी मनसे आमदार राजू पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्याकडे केली आहे.
कल्याण डोंबिवलीतील २७ गावांची स्वतंत्र नगरपालिका बनवावी अशी सर्वांची मागणी होती व तसे ठराव ग्रामपंचायतींच्या माध्यमातून शासनास सादर केलेले होते. त्या अनुषंगाने २०१५ मध्ये या सर्व गावांची मिळून एक नगरपालिका करण्याची अधिसूचना शासनाने काढली होती, परंतु महापालिका निवडणुका आधी ६ महिने हद्दीत फेरफार करता येत नाही, या मुद्द्यावर निवडणूक आयोगाने स्थगिती दिली होती. गेली जवळ जवळ पाच वर्षे स्वतंत्र नगरपालिकेचा विषय स्थगित ठेवला होता. या कालावधीत लोकप्रतिनिधी, सर्व पक्षीय संघर्ष समिती,स्थानिक नागरिकांकडून पाठपुरावा सुरू होता. तसेच विधानसभा आणि विधानपरिषद सभागृहातही हा विषय लोकप्रतिनिधीनी मांडून स्वतंत्र नगरपालिका करावी अशी मागणी केलेली होती असे आमदार पाटील यांनी निवेदनात म्हटले आहे.

 427 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.