पूजा मधाने विद्यार्थी भारतीच्या राजध्यक्षापदी

विद्यार्थी भारतीची राज्य कार्यरणी जाहीर

कल्याण : विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी काम करणाऱ्या विद्यार्थी भारती या संघटनेची राज्य कार्यकारणी जाहीर करण्यात आली आहे. झूम मिटिंग च्या माध्यमातून विद्यार्थी भारतीच्या आमरण उपोषणाची व राज्यकार्यकारणीची बैठक पार पडली. या बैठकीत विद्यार्थी भारतीच्या राष्ट्रीय अध्यक्ष मंजिरी धुरी यांनी हि कार्यकारणी जाहीर केली.
विद्यार्थी भारतीच्या राज्यध्यक्षापदी पूजा मुधाने, राज्य उपाध्यक्षपदी दीपक भोसले, निनाद पाटील, कार्यवाहपदी आरती गुप्ता, संघटकपदी सिद्धार्थ कांबळे, सचिवपदी साक्षी भोईर व प्रवक्तापदी आकाश पाटील यांची नियुक्ती केली आहे. सर्वच कार्यकर्त्याचे सर्व सिनियर मंडळींनी खुप खूप अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी सदिच्छा दिल्या. 

 614 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.