ठाणे जिल्हा परिषेदेच्या अध्यक्ष,उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचा दणदणीत विजय
ठाणे : ठाणे जिल्हा परिषदेच्या आज झालेली अध्यक्ष – उपाध्यक्ष पदाची निवडणूक बिनविरोध झाली. राज्यातील सत्तेचा फॉर्म्युला या निवडणुकीत अमलात आणल्यामुळे सुषमा लोणे यांची अध्यक्ष तर सुभाष पवार यांची उपाध्यक्षपदावर बिनविरोध निवड झाली. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव यांच्या समवेत आज सकाळी बैठक झाली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसची महाआघाडी गठीत करण्यात आली. त्यामुळे ठाणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी सुषमा लोणे तर उपाध्यक्ष पदी सुभाष पवार यांची बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला होता.
644 total views, 2 views today