कोरोना: राज्यातील मृत्यू दर घटला मात्र आज २१३ जणांचा मृत्यू

६७४१ नवे बाधित, ४५०० जणांसह १ लाख ४९ हजार ००७ बरे होवून घरी

मुंबई : मागील पाच दिवसात राज्यातील मृत्यूचा दरात सातत्याने घट होताना दिसत आहे. ९ जुलै रोजी राज्यात २१९ जणांचा मृत्यू झाला, त्यादिवशी मृत्यूचा दर ४.१९ टक्के, १० जुलै रोजी २२६ जणांचा मृत्यू तर दर होता ४.१५ टक्के, ११ जुलै रोजी ४.१ टक्के, १२ जुलै रोजी १७३ जणांचा मृत्यू तर दर होता ४.४ टक्के, काल १३ जुलै रोजी १९३ जणांचा मृत्यू तर ४.२ टक्के होता आणि आज २१३ जणांच्या मृत्यूची नोंद होत मृत्यू दर हा ४ टक्क्यापर्यत खाली आला. पाचच दिवसात .१९ टक्क्याने मृत्यूचा दर कमी झाला. यासंदर्भात साथ रोग प्रतिबंधकचे प्रमुख डॉ. प्रदीप आवटे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, मृतकांची आकडेवारी ही त्या त्या दिवशी नसते. त्यात मागील काही दिवसांची असते. तसेच त्या दिवसाची एकूण रूग्णसंख्येच्या प्रमाणात मृत्यूचा दर आपण निश्चित करत असतो.
आज ४५०० रुग्ण बरे होऊन घरी, राज्यात आजपर्यंत एकूण १,४९,००७ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ५५.६७% एवढे झाले आहे. आज राज्यात ६७४१ नवीन रुग्णांचे निदान झाले असून राज्यात आज २१३ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाल्याने सध्या राज्यातील मृत्यूदर ४ % एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १३,७२,९३९ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २,६७,६६५ (१९.४९ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ६,९८,८५४ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ४२,३५० व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये असल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

 515 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.