प्रभाग क्षेत्र अधिकारी सुधीर मोकल यांनी घेतली तक्रारीची दखल
कल्याण : अंबिवली स्टेशन परिसरातील चिकन, मटन दुकाने लाँकडाऊन मध्ये सुरु असल्याचा गवगवा होता. तसेच मटन, चिकन वाले त्यांच्या दुकानातील मांसाच्या कचऱ्याची योग्य ती विल्हेवाट लावीत नसल्याच्या तसेच मासंचा कचरा रस्त्यालगत टाकत असल्याबाबतचा प्रकार उघडकीस आला होता. याबाबत प्रभाग क्षेत्र आधिकारी सुधीर मोकल यांनी दखल घेत धडक कारवाईचा बडगा उचलित मटण चिकन दुकाना बाहेरील लोखंडी पिंजरे, अनाधिकृत चिकन मटण टपऱ्या जेसीबीने जमीन दोस्त करीत धडक कारवाई करण्यात आली.
799 total views, 1 views today