खाजगी रुग्णालयात होणारी रुग्णांची आर्थिक लुट थांबवा

डोंबिवलीतील नागरिक वंदना सोनावणे यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र

डोंबिवली : कोरोना पाॅझिटिव्ह रुग्णांना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले केल्यानंतर बिलाची आकडे पाहिल्यावर रुग्ण आणि नातेवाईकांनी ही आर्थिक लुट होत असल्याचा आरोप करत आहेत. ज्या रुग्णांचे कॅशलेश मेडिक्लेम असतात त्यांना मात्र बिलाची चिंता नसते. परंतु काही रुग्णांना लाखोची बिले भरताना नाकीनऊ येते. खाजगी रुग्णालयात न परवडणाऱ्या बिलासंदर्भात कडक कारवाई करावी. कल्याण – डोंबिवलीतील कोविड १९ ची रुग्णालये या गंभीर परिस्थितीचा फायदा घेत लाखोंची बिले बनवत आहेत असे पत्र डोंबिवलीतील नागरीक वंदना सोनावणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले आहे.
वंदना सोनावणे यांनी पत्रात म्हटले आहे कि, मुंबईत हे सर्व सुरळीत चालत असताना, कल्याण-डोंबिवलीत सध्याची परिस्थिती संपूर्णपणे हाता बाहेर जात असल्याचे दिसत आहे. महापालिका ते खाजगी रुग्णालय सर्वत्र कोविड रुग्णांचे हाल होत आहेत. मुंबईला केलेल्या उपाययोजना जर कल्याण-डोंबीवली महापालिका व खाजगी परिक्षेत्रात करता आले, तरी सामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळेल सरकारी व गैरसरकरी, खाजगी लॅब चे कोविड टेस्टची दर नियमित करून जाहीर करावी. हे जरी जाहीर झालेलेले आहेत तरी अजून प्रत्यक्षात जास्त दर आकारण्यात येत आहेत, व पावती सुद्धा दिली जात नाही कल्याण-डोंबिवलीत सर्व कोविड इस्पिताळाची, एकूण उपलब्ध बेड संख्या दर्शवण्यासाठी ऑनलाइन डॅश बोर्ड करण्यात यावेत (सरकारी किंवा गैरसरकरी), कोविडचा संशय आल्या पासून ते कोविडपासून बरे होईपर्यत सर्व प्रोसिजर एका SOP (standard operating procedure) द्वारे जाहीर करावी. हे sop सर्व सरकारी/गैर सरकारी यंत्रणा व नागरिकांनी काटेकोरपणे पालन करायला हवे.एक अडिशनल IAS ऑफिसर, देण्यात यावं जो इस्पितालांची बिलिंग सिस्टीमवर लक्ष ठेवतील व आर्थिक भ्रष्टाचारावर आळा बसेल. खाजगी रुग्णालयात न परवडणाऱ्या बिलासंदर्भात कडक कारवाई करावी.कल्याण – डोंबिवलीतील कोविड १९ ची रुग्णालये या गंभीर परिस्थितीचा फायदा घेत लाखोंची बिले बनवत आहेत.तसेच राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना पत्र दिले आहे.

 398 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.