आठवड्याभरात सुरु होणार केडीएमसीची स्वत:ची पहिली कोविड१९ टेस्टिंग लॅब

खासदार श्रीकांत शिंदे यांनी केली पाहणी

दररोज ३००० चाचण्यां करण्याची क्षमता
कल्याण : येत्या आठवडा भरात कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची स्वतःची पहिली कोविड टेस्टिंग लॅब सुरु होणार असून या लॅबच्या कामाची खासदार श्रीकांत शिंदे यांनी पाहणी केली.
कल्याण, डोंबिवली,  उल्हसनगर, अंबरनाथ, बदलापूर, भिवंडी शहरांमधील वाढते कोरोना विषाणूचे संक्रमण रोखण्यासाठी कोविड-१९ च्या जास्तीत जास्त चाचण्या केल्या जाव्यात तसेच या चाचण्यांच्या निकाल लवकरात लवकर मिळाल्यास संबंधित रुग्णाला वेळेत रुग्णालयात उपचार घेता येतील, याकरिता कल्याण डोंबिवली मनपा क्षेत्रात कोरोना चाचण्यांसाठीची लॅब सुरु करण्यासाठी खासदार श्रीकांत शिंदे यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या या प्रयत्नांना यश आले असून कल्याण – डोंबिवली महानगरपालिकेची स्वत:ची पहिली कोविड १९ टेस्टिंग लॅब कल्याण डोंबिवली महानगरपालिका आणि क्रशना डायग्नोस्टिक्स यांच्या संयुक्त विद्यमाने पीपीपी तत्वावर सुरु करण्यात येत आहे.
गौरीपाडा, कल्याणपश्चिम परिसातील त्रिमूर्ती पार्क येथील महापालिकेच्या वास्तूमध्ये सदर लॅब उभारण्यात येत असून आज शिंदे यांनी या लॅबची पाहणी करत तेथील यंत्रणेचा आढावा घेतला. याप्रसंगी माजी महापौर व स्थानिक नगरसेवक राजेंद्र देवळेकर  व महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते. या लॅबमध्ये दररोज ३००० चाचण्यां करण्याची क्षमता असून यासाठी आवश्यक यंत्रसामुग्री ही क्रशना डायग्नोस्टिक्सच्या माध्यमातून उपलब्ध करण्यात आली आहे. नॅशनल एक्रेडिटेशन बोर्ड फॉर टेस्टिंग अँड कॅलिब्रेशन लॅबोरेटोरीज (#NABL) या संस्थेची मान्यता मिळाल्यावर येत्या आठवड्याभरात ही लॅब कार्यान्वित होईल. यामुळे कल्याण, डोंबिवली, उल्हसनगर, अंबरनाथ, बदलापूर, भिवंडी शहरांतील नागरिकांना मोठ्या प्रमाणावर याचा फायदा होणार आहे.  कोविड-१९ चाचण्यांच्या निकाल उपलब्ध होण्याचा कालावधी कमी होणार असून रुग्णांवर उपचार देखील लवकरात लवकर होण्यास मदत होणार आहे.
 

 375 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.