आठ पोलीस कर्मचाऱ्यांची कोरोनावर मात

बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात जंगी स्वागत
बदलापूर : बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यातील आठ पोलीस कर्मचारी कोरोनावर यशस्वी मात करीत पुन्हा कर्तव्यावर हजर झाले. या कोरोना योद्ध्यांचे पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस अधिकारी लक्ष्मण सारीपुत्र यांच्या सह अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी पुष्पवृष्टी करून मोठ्या उत्साहात स्वागत केले.
बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यातील एक पोलीस अधिकारी व सात पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली होती. दोन पोलीस कर्मचाऱ्यांचे कुटुंबिय देखील संक्रमित झाले होते. मात्र उपचारानंतर या सर्व पोलीस कर्मचाऱ्यांनी कोरोनावर यशस्वी मात केली. हे पोलीस कर्मचारी पुन्हा कर्तव्यावर रुजू झाले. त्यावेळी बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक लक्ष्मण सारिपुत्र यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कोरोनावर यशस्वी मात करणाऱ्या या कोरोना योद्ध्यांवर पुष्पवृष्टी करून त्यांचे जंगी स्वागत केले.
बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्याच्या हद्दीत पालिकेचे भव्य कोविड केअर सेंटर असल्याने पोलिसांवर आधीच प्रचंड ताण आहे. त्यात अचानक सात कर्मचारी आणि एक अधिकारी कोरोना पॉझिटिव्ह झाल्याने बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांमध्ये प्रचंड दडपण आले होते. आपल्या या सर्व अधिकारी आणि कर्मचारी सहकाऱ्यांनी कोरोनावर यशस्वी मात केल्यानंतर या पोलीस ठाण्यातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.

 508 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.