कोरोना योध्द्यांचा सन्मान करून कार्याला प्रारंभ

बदलापूरचे कोवीड योद्धे डॉक्टर राजेश अंकुश, डाॅक्टर अशिलाक शिंदे आणि डाॅक्टर दिनेश समेळ यांचा मानपत्र आणि शाल श्रीफळ देऊन केला सत्कार

बदलापूर : रोटरी क्लब ऑफ बदलापूर इंडस्ट्रियल एरीयाच्या नवीन अध्यक्ष डाॅ. श्रद्धा सोमण यांनी अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली आणि पहिल्याच दिवशी बदलापूरचे कोवीड योद्धे डॉक्टर राजेश अंकुश, डाॅक्टर अशिलाक शिंदे आणि डाॅक्टर दिनेश समेळ यांचा मानपत्र आणि शाल श्रीफळ देऊन सत्कार केला. कोरोना योध्द्यांचा सन्मान करून डॉ. श्रद्धा सोमण यांनी आपल्या अध्यक्ष पदाच्या कार्याला प्रारंभ केला.
रोटरी क्लब ऑफ बदलापूर इंडस्ट्रियल एरिया च्या अध्यक्ष पदाची सूत्रे डॉ. योगेंद्रजावडेकर यांच्या कडून डॉ. श्रद्धा सोमण यांनी अलीकडेच स्वकारली. आपल्या कार्याची सुरुवात त्यांनी कोविड योध्यांचा सत्कार करून केली. डाॅ. राजेश अंकुश हे बदलापूर पालिकेच्या दुबे रुग्णालयाचे आणि कोविड चे काम पाहतात. डाॅ. शिंदे हे ग्रामीण रुग्णालय आणि सोनिवली येथील कोवीड सेंटरची जबाबदारी सांभाळतात, तर बदलापूरचे डाॅक्टर दिनेश समेळ यांच्यावर ठाण्याच्या कासार वडवली आणि भाईंदर पाडा येथील कोवीड सेंटरची प्रामुख्याने आणि ठाण्यातील इतर विभागांची जबाबदारी आहे. गेल्या चार महिन्यात या तिघानीही एकही दिवस सुटी घेतलेली नाही. अशा कर्तव्यदक्ष लोकांचा रोटरीने नेहमीच कौतुक आणि आदर केला आहे. क्लबचे नवनिर्वाचित सेक्रेटरी डाॅक्टर दिलीप मानगेकर आणि इतर पदाधिकारी सत्कार करण्यास उपस्थित होते.
डॉ. श्रद्धा सोमण अध्यक्ष, डॉ. दिलीप मानगेकर सेक्रेटरी, राजीव दिवाण, रवींद्र रानडे, वैभव लवाटे, डॉ. सविता जावडेकर, पराग पोतनीस, कपिल पढेर, डॉ. उबाळे, अमित पाध्ये, डॉ. विद्या राठोड आदींचा नवीन कार्यकारिणीमध्ये समावेश आहे.

 456 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.