पदभार स्वीकारताच करावयाच्या कामांची यादी केली सादर
कल्याण : कल्याण पंचायत समितीची नवीन इमारत बांधण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे कल्याण पंचायत समितीचे नवनिवौचित उपसभापती रमेश बांगर यांनी पदभार स्वीकारल्यानंतर सांगितले.
कल्याण पंचायत समितीची सभापती व उपसभापती पदाची निवडणूक पार पाडली आसून सभापती व उपसभापती हे दोन्ही शिवसेनेचे उमेदवार होते, कल्याण पंचायत समितीची पदभार स्वीकारल्यानंतर उपसभापती रमेश बांगर यांनी सांगितले की ,पंचायत समितीची इमारत धोकादायक झाली आहे, नवीन इमारत बाबत जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष यांची भेट घेतली व नवीन इमारत बांधण्याची मागणी केली. इमारत दुरूस्ती करीता ७६लाख रूपये मंजूर करण्यात आले आहेत, नवीन इमारतीसाठी जिल्हा परिषद ठराव व इजिंनियर नकाशा महापालिका प्रशासना कडे पाठवणे गरजेचे आहे व त्या नंतर महापालिका परवानगी देईल, यासाठी आपण पालकमंत्री तसेच सार्वजनिक बांधकाम मंत्री यांची भेट घेणार असल्याचे स्पष्ट केले ,तसेच आरोग्य विभागाकडून गामीण भागात उपकेंद्र बांधली आहेत ती सुरू करण्यासाठी व परिचारिका भरतीसाठी तसेच स्वतंत्र वैद्यकिय अधिकाऱ्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार, ग्रामसेवक व अधिकारी यांनी जनतेच्या कामासाठी कार्यालयात वेळेवर उपस्थित राहावे अशा सूचना आधिकायांना दिल्या आहेत, तालुक्याचा विकास करिता आपण सर्वानी सहकार्य करावे, कोरोना आजाराने ग्रामीण भागातही शिरकाव केला असून जनतेने नियम पाळावे, तसेच कोवीड दवाखाना वरप येथे सुरू करण्याकरिता शासनाकडे पत्रव्यवहार केला आहे, असे सांगितले,
515 total views, 1 views today