भाजपा महिला शहरअध्यक्षा पुष्पा रत्नपारखी यांचा आरोप
कल्याण : वालधुनी नदी परिसरात पावसाचे पाणी भरते यासाठी पालिका प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप भाजपा महिला शहरअध्यक्षा पुष्पा रत्नपारखी यांनी केला आहे.
वालधुनी नदी सध्या खूपच प्रदूषित झाली असून नदीचे रूपांतर नाल्यात झाले आहे. या नदीच्या पात्रामध्ये बरीचशी मोठमोठी बांधकामे पालिकेच्या व बिल्डरांच्या संगनमताने, रीव्हर कोस्टल झोनचे नियम धाब्यवर बसवुन करण्यात आली आहेत. बर्याच ठिकाणी भराव टाकण्यात आला असून सध्या स्मार्ट सिटिचे सिटि पार्क ह्या प्रकल्पासाठी जोरदार भरणी चालूच आहे. यामुळे देखील या नदीचे पात्र अरुंद झाले आहे.
तसेच या मोठमोठया संकुलांमधील सांडपाणी, सार्वजनिक शौचालयांचे दूषित पाणी व मोठ मोठे नाले यांचे सांडपाणी, उल्हासनगर, शहाड येथील छोट्या मोठ्या फॅक्टऱ्यांचे दूषित पाणी कोणतिहि प्रक्रीया न करता सर्रास ह्या नदित सोडले जाते. पृथ्वीवरील पीण्यायोग्य पाणि संपत असतानाच, एका जिवंत जलस्रोतांचे नाल्यात रूपांतर झाले असून, या नदीकाठावर व नदीपात्रांमध्ये अतिक्रमण करून जे भराव व बांधकामे केली गेली आहेत, यामुळे पावसाळ्यात पूर येतो व येथील रहिवासी संकुलांमधे पाणी भरते, व नागरीकांचे अतोनात हाल होतात.
अशा प्रकारे हा वालधुनि जलस्रोत दूषित होऊन नष्ट होण्याच्या मार्गावर आहे व दुसरीकडे अरुंद पात्र झाल्यामुळे लगतच्या परिसरात पावसाळ्यात पाणि भरते. याबाबत सर्वस्वी महानगर पालिका प्रशासन व प्रदूषण नियंत्रण बोर्ड जबाबदार असल्याचा आरोप ,”भारतीय जनता पार्टीच्या”, कल्याण शहर महिला अध्यक्षा पुष्पा रत्नपारखी यांनी केला आहे.
लवकरात लवकर नदीचा गाळ काढून, नदीपात्र स्वच्छ करावे. तसेच अरूंद पात्र झाल्यामुळे पाणी भरून जो लोकांना त्रास होतो त्यापासून वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न व उपाययोजना पालिका प्रशासनाने करावे. कारण पालिकेच्या नगररचना विभागाने प्रकल्पाचा आराखडा मंजूर केला आहे व येथे राहणारे रहिवाशी नियमितपणे टॅक्स भरत आहेत तर लोकांना त्रास होणार नाहि याचा विचार महानगर पालिकेने करावा. नदी स्वच्छतेसाठी किंवा गरज असल्यास कुठे भिंती बांधण्यासाठी लागणारा निधी राज्य सरकार, केंद्र सरकार यांकडून मिळविण्यात यावा अशी मागणी देखील पुष्पा रत्नपारखी यांनी पालिका प्रशासनाकडे केली आहे.
481 total views, 1 views today