कल्याण डोंबिवलीत कोरोना रुग्णांनी ओलांडला १३ हजारांचा टप्पा

४२७ रुग्ण तर ९ जणांचा मृत्यू
१३२४० एकूण रुग्ण तर १९८ जणांचा आतापर्यंत मृत्यू


कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील कोरोना रुग्णांनी १३ हजारांचा टप्पा ओलांडला असून आज ४२७ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर ९ जणांचा मृत्यू झाला असून फक्त ५४ जणांनाच गेल्या २४ तासांत डिस्चार्ज देण्यात आला आहे.  आजच्या या ४२७  रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या १३२४०  झाली असून यामध्ये ६६३३ रुग्ण उपचार घेत असून ६४०९ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत १९८  जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजच्या ४२७ रूग्णांमध्ये  कल्याण पूर्व -६२, कल्याण प.-११६, डोंबिवली पूर्व -१३७, डोंबिवली प-७७, मांडा टिटवाळा- १०, मोहना – २३ तर पिसवली येथील २ रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान गेले ३ दिवस कोरोना रुग्णांची संख्या ६०० पार होत होती. हीच रुग्ण संख्या आज ५०० च्या आत असल्याने काहीसा दिलासा मिळाला असला तरी आज केवळ ५४ जणांनाच डिस्चार्ज मिळाल्याने हि चिंतेची बाब आहे.

 482 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.