या अंड्याची कृत्रिम रीतीने जोपासना करण्यात आली होती
कल्याण : सर्पमित्रानी गांधारी येथील मानवी वस्तीतून पकडलेल्या नागिनीने दिलेली १३ अंडी वनखात्याच्या निगराणीखाली सुरक्षित ठेवली होती. या अंड्यातून आज सकाळी नागाची १३ पिल्ले सुखरूप बाहेर पडली असून या पिल्लांना वनविभागाच्या मार्गदर्शनाखाली जंगलात सोडले जाणार असल्याचे सर्पमित्र सुहास पवार यांनी सांगितले.
दीड महिन्यापूर्वी कल्याण प्स्चीमेक्डील गांधारी परिसरातील मानवी वस्तीत नाग असल्याची माहिती मिळताच सर्पमित्र सुहास पवार, दत्ता बोंबे आणि टीमने घटनास्थळी धाव घेत या नागाला पकडले असता मादी जातीचा किंग कोब्रा वर्गातील साप अंडी देण्याच्याअवस्थेत असल्याचे आढळून आले. यामुळे सर्पमित्रनि या नागीणीला वनविभागाच्या कार्यालयात सुरक्षित ठेवले होते. याठिकाणी या नागिनीने १३ अंडी घातली. यानंतर या नागीणीला सुरक्षित जंगलात सोडण्यात आले तर या अंड्याची कृत्रिम रीतीने जोपासना करण्यात आली होती आज या सर्व अंड्यातून नागाची पिल्ले बाहेर निघाली. लवकरच या पिल्लांना देखील जंगलात सोडले जाणार आहे.
465 total views, 1 views today