७८२७ नवे बाधित, १७३ मृतकांची नोंद, ३३४० जण बरे होवून घरी
मुंबई : साधारणत: एक महिन्यापूर्वी अर्थात १२ जून २०२० रोजी राज्यातील कोरोनाबाधीतांची संख्या १ लाख १ हजार १४१ वर होती. तर बरे होणाऱ्यांची संख्या ४७ हजार ७९६ होती. त्यानंतर तब्बल एक महिन्यानंतर १२ जुलै २०२० रोजी म्हणजे आज एकूण बाधित रूग्णांच्या संख्येत वाढ होत एक महिन्यापूर्वीच्या १ लाख ३ हजार ५१६ संख्येवर पोहोचली आहे. तसेच एक महिन्यापूर्वी ४७ हजार ७९६ वर असलेली बरे होणाऱ्यांची संख्या आजस्थितीला १ लाख ४० हजार ३२५ वर पोहोचली आहे. त्यामुळे बरे होणाऱ्यांची संख्याही १ लाखाने वाढली. तर बाधित रूग्णांच्या संख्येत ५०,१७१ हजाराने वाढ होत पुन्हा महिनाभरात १ लाखाची संख्या पार केल्याचे दिसून येत आहे.
काल २४ तासात ९९ हजारावर बाधितांची संख्येत आज त्यात ७८२७ कोरोनाबाधितांची नव्याने भर पडल्याने बाधित रूग्णांच्या संख्येने तब्बल १ लाख ३ हजार ५१६ वर पोहोचली आहे. तर एकूण रूग्ण संख्या २ लाख ५४ हजार ४२७ वर पोहोचली. १७३ जणांच्या मृत्यूची २४ तासात नोंद झाली आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ५५.१५% एवढे झाले आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर ४.०४ % एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १३,१७,८९५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २,५४,४२७ (१९.३ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ६,८६,१५० व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ४७,८०१ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये असल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.
जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे
अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
१ मुंबई महानगरपालिका १२४३ ९२९८८ ४४ ५२८८
२ ठाणे ३१० ८३४७ ६ १५९
३ ठाणे मनपा ४६५ १४७५७ २२ ५५९
४ नवी मुंबई मनपा ३२१ १०८३७ १० २८८
५ कल्याण डोंबवली मनपा ७७९ १४६११ ५ १९९
६ उल्हासनगर मनपा २९२ ४३८१ १ ७३
७ भिवंडी निजामपूर मनपा ८१ २९७६ २ १७०
८ मीरा भाईंदर मनपा १३४ ५९६० २ १९८
९ पालघर ४९ १८५१ १ २२
१० वसईविरार मनपा ३५२ ७८९३ ७ १६६
521 total views, 1 views today