एन एम भामरे यांची कोकण विभाग संयोजक म्हणून पुनर्नियुक्ती

भाजपा शिक्षक आघाडी कोकण विभागावर शिक्षकांच्या नियुक्त्या जाहीर
 
कल्याण : शिक्षकांच्या समस्या सोडवण्यासाठी भाजपा शिक्षक आघाडी सातत्याने कार्यरत आहे. भाजपा शिक्षक आघाडी संपूर्ण महाराष्ट्रात कार्यरत असून नुकतीच एन एम भामरे यांची कोकण विभाग संयोजक म्हणून पुनर्नियुक्ती  झाली आहे.
प्रदेश सहसंयोजक विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कोकण विभागात शिक्षक आघाडीचा विस्तार सुरू करण्यात आला आहे. यात कल्याण जिल्हा संयोजक पदी गुरुनानक इंग्लिश हास्कुलचे विनोद शेलकर यांची तर उल्हासनगर संयोजिका म्हणून सिंधू शर्मा, ठाणे जिल्हा संयोजक म्हणून संदीप कालेकर यांची निवड आधीच करण्यात आली होती.
शिक्षकांच्या समस्या जिल्हानिहाय मांडता याव्यात व शिक्षक आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देता यावा म्हणून जिल्हानिहाय नियुक्त्या देण्यास सुरुवात झाली आहे. यात समाजसेवेचे व्रत हाती घेतलेले व संघटनेसाठी आणि शिक्षकांसाठी मनोभावे काम करू इच्छिणाऱ्या शिक्षकांना मोठ्या प्रमाणावर संधी देण्यात येत आहे.  
कोकणविभाग सहसंयोजक पदी किशोर पाटील,  मिराभाईंदर संयोजक पदी प्रकाश सोनार, भिवंडी महनगर संयोजक पदी जि.ओ.माळी तर ठाणे ग्रामीण संयोजक पदी जगदीश पाटील यांच्या नियुक्त्या महाराष्ट्र प्रदेश भाजपा शिक्षक आघाडी यांच्या वतीने करण्यात आलेल्या आहेत अशी माहिती कोकण विभाग संयोजक एन.एम.भामरे यांनी दिली.

 615 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.