महाराष्ट्राच्या “२१व्या कबड्डी दिनाचा” कौतुक सोहळा रद्द

मात्र कबड्डी दिन साधेपणाने शासनाच्या आदेशानुसार साजरा होणार.
मुंबई : महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटना. “ कबड्डीमहर्षी” शंकरराव (बुवा) साळवी यांचा “जन्मदिवस” “कबड्डी दिन” म्हणून साजरा करते. महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेला संलग्न विविध जिल्ह्यात गेली २०वर्ष हा “कबड्डी दिन” साजरा केला जात आहे. यंदा मात्र महाराष्ट्रात पसरलेल्या कोरोनाच्या साथीमुळे राज्य संघटनेने हा कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेतला.
हा कार्यक्रम जरी रद्द केला असला तरी कबड्डी दिन मात्र साधेपणाने साजरा करण्यात येणार आहे.१५जुलै रोजी सायं. ५-३० वा. मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदान, दादर येथील राज्य कबड्डी संघटनेच्या कार्यालयात महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेचे कार्याध्यक्ष व उपनगर कबड्डी संघटनेचे माजी अध्यक्ष खासदार गजानन कीर्तिकर यांच्या हस्ते बुवांच्या तस्वीरीला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वहाण्यात येऊन साजरा करण्यात येईल. त्याच बरोबर सर्व संलग्न जिल्हा संघटनांनी देखील आपल्या जिल्ह्यात, तालुक्यात ज्या ठिकाणी शक्य असेल त्या ठिकाणी शासनाच्या आदेशाचे पालन करून हा “कबड्डी दिन” साजरा करून बुवांच्या कार्याला मानवंदना द्यावी असे आव्हान राज्य संघटनेचे सचिव आस्वाद पाटील यांनी या पत्रकाद्वारे जिल्हा संघटनांना केली आहे.

 584 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.