भारतीय जैन समाजाच्या वतीने आयोजित करण्यात आला उपक्रम
कल्याण : सध्याच्या कोरोना महामारीच्या काळात डॉक्टर, आरोग्य कर्मचारी यांच्यासोबतच पोलीस देखील अहोरात्र आपले कर्तव्य बजावत आहेत. हे कर्त्यव्य बजावत असतांना अनेक पोलीस कर्मचाऱ्यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे पोलिसांचे आरोग्य सुस्थितीत आहे कि नाही हे कळावे यासाठी भारतीय जैन समाजाच्या वतीने कल्याण मधील वाहतूक पोलिसांची आरोग्य तपासणी करण्यात आली. या तपासणीत स्क्रिनिंग व पल्स ऑक्सिमीटरद्वारे ऑक्सिजनची पातळी तपासण्यात आली असल्याची माहिती वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक सुखदेव पाटील यांनी दिली.
552 total views, 1 views today