स. है. जोंधळे विद्यालयाची इमारत कोविड रूग्णांसाठी सज्ज

शासनाला दिलासा मिळावा व जनतेची सोय व्हावी म्हणून हि इमारत कोविड रूग्णांसाठी उपलब्ध करण्याचा विचार करून संचालक मंडळाने स्वयंस्फूर्तीने हा कल्याणकारी निर्णय घेतला. याठिकाणी सुमारे २०० रुग्णांची सोय होणार आहे

कल्याण : डोंबिवली पश्चिमेकडील स्टेशन लगतची शास्त्रीनगर परिसरातील स. है. जोंधळे विद्यालयाची इमारत कोविड रूग्णांसाठी सज्ज झाली असून समर्थ समाज, जोंधळे विद्यासमुहाचे संचालक विश्वस्त सागर जोंधळे यांनी स्वताहून कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आयुक्तांना संपर्क करून हि इमारत पालिकेच्या ताब्यात दिली आहे.
या इमारतीमध्ये ४९ वर्ग खोल्या असून एक मोठा हॉल उपलब्ध आहे. डोंबिवली परिसरात कोविड १९ च्या साथीने थैमान घातले आहे. दररोज शेकडोंनी लोकं या रोगाने आजारी पडत आहेत. महापालिकेची व खाजगी सर्व रुग्णालये रूग्णांनी भरलेले आहेत. या गंभीर परिस्थितीतून शासनाला दिलासा मिळावा व जनतेची सोय व्हावी म्हणून हि इमारत कोविड रूग्णांसाठी उपलब्ध करण्याचा विचार करून संचालक मंडळाने स्वयंस्फूर्तीने हा कल्याणकारी निर्णय घेतला. याठिकाणी सुमारे २०० रुग्णांची सोय होणार आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आयुक्तांनी या इमारतीचा ताबा घेऊन कोविड केंद्रासाठी या इमारतीचा उपयोग करून डोंबिवलीकरांना दिलासा मिळणार आहे.

 6,611 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.