पालिकेच्या प्रयत्नाला जनकल्याण समितीची साथ

जनकल्पाण समितीचे कार्यकर्ते घरोघरी जावून करीत आहेत नागरीकांच्या आरोग्याची तपासणी

  कल्याण :  कोरोना साथीच्या प्रादुर्भावावर प्रतिबंध घालण्यासाठी महापालिका अथक प्रयत्न करीत आहे. या प्रयत्नाला आता जनकल्याण समितीच्या कार्यकत्यांचीही साथ लाभत असल्याने कोरोना रुग्णांचा शोध घेण्यास पालिकेला अधिक सोपे जाणार आहे .
महापालिका क्षेत्रात आढळून येणाऱ्या कोरोना बाधीत रुग्णांच्या परिसरातील सर्वेक्षण करुन हाय रिस्क कॉन्टॅक्टची टेस्ट करुन त्यांस आढळून येणाऱ्या लक्षणानुसार रुग्णालयात दाखल केले जाते अथवा क्वारनटाईन केले जाते. वाढत्या रुग्ण संख्येला आळा घालण्यासाठी घरोघरी सर्वेक्षण करणेकामी आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांच्या आवाहनाला मान देवून जनकल्याण समितीचे कार्यकर्ते महापालिका क्षेत्रात घरोघरी जावून सर्वेक्षण काम ,नागरीकांचे स्क्रिनिंग व पल्स ऑक्सिमीटर द्वारे ऑक्सिजन तपासण्याचे काम करीत आहे.
या सर्वेक्षणात आढळणाऱ्या तापाच्या रुग्णांची महापालिकेतर्फे अँटीजेन टेस्ट करण्यात येणार आहे,ज्यामुळे टेस्टचे निदान लवकर होऊन पुढची उपचार पद्धती ठरविणे महापालिकेस सोयीचे होणार आहे .
महापालिका क्षेत्रातील आपल्या जनतेला मदत करण्याच्या दृष्टीकोनातून महापालिका करीत असलेल्या सर्वेक्षणाच्या कामात मदत करु इच्छिणाऱ्या  नागरीकांनी, एन.जी.ओनी, इतर सेवाभावी संस्थानी महापालिकेच्या आरोग्य खात्याशी संपर्क साधावा असे आवाहन पालिका आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांच्यामार्फत करण्यात येत आहे.

 561 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.