निफ्टी १.४७% ने तर सेन्सेक्स १.२९% ने वाढला
मुंबई : आजच्या व्यापारी सत्रात ऑटो आणि मेटल स्टॉक्सनी बाजारात उत्कृष्ट कामगिरी केल्याने सलग चौथ्या दिवशी भारतीय बाजार सकारात्मक स्थितीत बंद झाला. बाजाराचा निर्देशांक सकारात्मक स्थितीत निफ्टीने १० हजारांच्या पातळीपुढे स्थान कायम राखत १.४७% किंवा १५६.३० अंकांची वाढ घेतली. निफ्टी १०,७६३ अंकांवर बंद झाला. दुसरीकडे एसअँडपी बीएसई सेन्सेक्स १.२९% किंवा ४६५.८६ अंकांनी वाढला व तो ३६,४८७ अंकांवर स्थिरावला. निफ्टी १.४७% ने तर सेन्सेक्स १.२९% ने वाढला.
एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे प्रमुख सल्लागार अमर देव सिंह यांनी सांगितले की आजच्या सत्रात जवळपास १५९६ शेअर्सनी आघाडी घेतली तर ११४४ शेअर्सनी घट दर्शवली. १८२ शेअर्स स्थिर राहिले. एमअँडएम (७.३९%), बजाज फायनान्स (६.४६%), हिंडाल्को इंडस्ट्रीज (५.६७%), टाटा मोटर्स (५.३६%), रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (३.७५%) हे आजच्या व्यापारी सत्रातील लाभाचे प्रमुख वाटेकरी ठरले. तर बजाज ऑटो (१.०७%), गेल (१.००%), भारती एअरटेल (०.९५%) आणि एचडीएफसी लिमिटेड (०.७२%) हे बाजारातील टॉप लूझर्स ठरले. बीएसई मिडकॅप आणि बीएसई स्मॉल कॅप हे दोन्ही अनुक्रमे १.२७% आणि १.३०% नी वधारले. एफएमसीजी आणि फार्मा क्षेत्र वगळता इतर सर्व सेक्टरल निर्देशांकांनी सकारात्मक स्थिती दर्शवली.
अमेरिकी डॉलरकडून आजच्या व्यापारी सत्रात इक्विटी बाजारात सकारात्मक भावना दिसूनही भारतीय रुपया डॉलरच्या तुलनेत घसरून त्याचे मूल्य ७४.६८ रुपये एवढे झाले.
जगभरातील गुंतवणूकदारांना कोव्हिड-१९ लस विकसित होणे आणि आर्थिक विकासाची अपेक्षा आहे. परिणामी जागतिक बाजारात तेजी दिसून आली. नॅसडॅकने आजच्या व्यापारी सत्रात विशेष कामगिरी केली नाही. एफटीएसई१०० चे शेअर्स २.०७%, एफटीएसई एमआयबीचे शेअर्स २.०१%, निक्केई २२५ चे शेअर्स १.८३% नी तर हँगसेंगचे शेअर्स ३.८१% नी वाढले.
559 total views, 2 views today