कोरोना: ७ दिवसात १ हजाराने वाढत मृतकांची संख्या ९ हजार २६ वर

३५२२ जण बरे होवून घरी, ५३६८ नवे बाधित रूग्ण

मुंबई : राज्यात २४ तासात २०४ जणांच्या मृत्यूसह एकूण मृतकांची संख्या ९ हजार २६ वर पोहोचली. १५ जून रोजी नोंदीत राहीलेले १५०० च्या आसपास मृतकांची संख्या समाविष्ट केल्यानंतर मृतकांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढीस सुरुवात झाली. १५ ते ३० जून महिना अखेर मृतकांची संख्या ७म हजार ८५३ वर पोहोचली. तर १ जुलै ते ७ जुलै या ७ दिवसात १ हजार २४ जणांच्या मृतकांची नोंद झाली असल्याने गेल्या महिन्याच्या तुलनेत सर्वाधिक मृत्यू या ७ दिवसात झाल्याचे दिसून आल्याचे स्पष्ट होत आहे.
यातील सर्वाधिक मृत्यू हे मुंबई आणि ठाणे मंडळातील असून मुंबईत आतापर्यत ४९३८ आणि उपनगर आणि जिल्यातील मिळून ६ हजार ५१५ जणांचा मृतकांची नोंद झाली आहे. तसेच पुणे विभागात १२४४ तर नाशिक विभागात ६२८, औरंगाबाद विभागात ३३५ जणांची आतापर्यत मृतकांची नोंद झाली असून या चार विभागातच बाधितांची आणि मृतकांची संख्या सर्वाधिक असल्याचे दिसून येत आहे.
आज ३५२२ रुग्ण बरे होऊन घरी , राज्यात आजपर्यंत एकूण १,१५,२६२ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ५४.३७ % एवढे झाले आहे. आज राज्यात ५३६८ नवीन रुग्णांचे निदान. राज्यात आज २०४ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद. सध्या राज्यातील मृत्यूदर ४.२६ % एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ११,३५,४४७ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २,११,९८७ (१८.६७ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ६,१५,२६५ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ४६,३५५ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये असल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

 497 total views,  3 views today

Leave a Reply

Your email address will not be published.